स्वजातीने नाकारल्याने अनेक ओबीसी नेत्यांचं ‘डिपॉझिट’ जप्त; वाचा कुणाला किती झालं मतदान

स्वजातीने नाकारल्याने अनेक ओबीसी नेत्यांचं ‘डिपॉझिट’ जप्त; वाचा कुणाला किती झालं मतदान

Lok Sabha Election 2024 :  महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत यावेळी सर्वात प्रभावी मुद्दा ठरला तो मराठा आरक्षण. मनोज जरांगे यांनी जो मराठा आरक्षणाचा लढा उभा केला त्यांचं लोन फक्त मराठवाड्यात नाही तर संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाल. दरम्यान, या लढ्यात जो संघर्ष उभा राहिला तो सरळ-सरळ मराठा विरूद्ध ओबीसी असा पाहायला मिळाला. (OBC) यामध्ये मराठा नेत्यांपेक्षा ओबीसी नेत्यांनी जास्त आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र राज्यभरात होत. कारण मराठा समाजाची ओबीसीमधून आरक्षणची मागणी हे आहे. दरम्यान, राज्यात आपली ताकद दाखवण्याची संधी ओबीसी नेत्यांकडे चालून आली होती. (Maratha) त्या पार्श्वभूमीवर काही ओबीसी नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामध्ये एकाही मोठ्या नेत्याला पक्ष-संघटनांच्या बॅनरखाली निवडून येता आलं नाही. तसंच, कित्येकांना स्वजातीने नाकारल्याने ‘डिपॉझिट’जप्त झालं आहे.

मतदारांनी सपशेल नाकारलं मराठवाड्याचा  जरांगे पाटील फॅक्टर  दिग्गज नेत्यांचा पराभव, भाजपला केलं हद्दपार

ओबीसी बहुजन पार्टी स्थापन केलेले धनगर नेते प्रकाश शेंडगे यांना सांगलीत मतदारसंघात फक्त ८ हजार २५१ मतं मिळालीत. त्याचबरोबर गेल्या निवडणुकीत दीड लाखांहून अधिक मते घेणाऱ्या कुणबी समाजाचे नेते राजाराम पाटील यांचीही स्थिती अशीच झाली आहे. पाटील मावळमधून लढले. त्यांना अवघी ४ हजार मतं मिळाली आहेत. त्याचबरोबर ओबीसी सेवा संघाचे नेते प्रदीप ढोबळे यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांना १ हजार १९६ मतांपेक्षा अधिक मतं मिळवता आलेली नाहीत. तर, प्राध्यापक श्रावण देवरे यांनी वेगळी चूल मांडूनही उपयोग झाला नाही. ओबीसी आणि इतर घटकांतील २५ संघटनांना एकत्र केलेल्या ओबीसी एनटी पार्टी संजय कोकरे यांच्या पक्षालाही यश आलं नाही. तसंच, बंजारा, धनगर, भटके विमुक्त आणि एकूणच ओबीसी समाजातील नेत्यांना मतदारांनी सपशेल नाकारलं असल्याच यामधून स्पष्ट चित्र समोर आलं आहे.

एक लाख 34 हजार मतांनी पराभव

राज्यात ओबीसींच्या विविध संघटनांच्या नावाखाली पक्ष, संघटना चालवणाऱ्या नेत्यांमध्ये हरिभाऊ राठोड, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, प्रदीप ढोबळे, राजाराम पाटील, लक्ष्मण हाके, कृष्ण फुलकारी, धनाजी गुरव आदी नेत्यांना ओबीसी मतदारांनी लोकसभा निवडणुकीत सपशेल नाकारल्याचं चित्र आहे. यातील कित्येकांना आपलं ‘डिपॉझिट’ही आलेलं नाही. त्यामध्ये अनेकजण आपली स्वजातीची मतंही खेचू शकलेली नाहीत. त्यामुळे सर्वांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागले आहे. धनगरांचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा परभणी लोकसभा मतदारसंघात 5 लाख धनगर मत असतानाही तब्बल एक लाख 34 हजार मतांनी पराभव झालाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube