‘त्याच लोकांनी प्रश्न विचारले, उत्तरही तेच देतील’; अजितदादांना पाटलांचा खोचक टोला

‘त्याच लोकांनी प्रश्न विचारले, उत्तरही तेच देतील’; अजितदादांना पाटलांचा खोचक टोला

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला खोचक टोले लगावले आहेत. अधिवेशनात विचारण्यात आलेले प्रश्न सध्या सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्याच लोकांनी विचारले होते. 17 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे. नव्या मंत्र्यांनाही अभ्यासाची गरज आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांना तयारी करावी लागेल. पण सगळे प्रश्न त्याच लोकांनी विचारले होते. आता त्या बाजूला जाऊन त्या प्रश्नांची उत्तरंही तेच लोक देतील, असा टोला पाटील यांनी लगावला.

पाटील यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी जे नवे सहकार बरोबर घेतले आहेत त्यांच्यात एकमत दिसत नाही असा त्याचा अर्थ निघतो. शपथ घेतल्याच्या दिवशीच सायंकाळपर्यंत खातेवाटप केले गेले पाहिजे असा प्रघात आहे. पण अजूनही झालेलं नाही त्यामुळे आता हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचारला गेला पाहिजे.

अजितदादा फरफटत जाणार नाहीत, योग्यवेळी ताकद दाखवतील; रोहित पवारांचे सूचक विधान…

याबाबत लवकरात लवकर निर्णय करून राज्यकारभार त्यांनी सुरु केला पाहिजे. प्रशासन देखील गोंधळात आहे. पालकमंत्री पदाचाही निर्णय त्यांनी अजून घेतलेला नाही, असे पाटील म्हणाले.

जयंत पाटलांनी मान्य केलं संख्याबळ घटलं

विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा असेल असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पाटील म्हणाले, आता काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल असे सध्याच्या संख्याबळावरून दिसत आहे. आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून यावर लवकरात लवकर निर्णय घेऊ. आता पावसाळी अधिवेशन सुरु होत असून लोकांच्या मनात प्रश्न आहे की विरोधी पक्षात आता कोण राहिलं आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पाटील म्हणाले, विरोधी पक्षात कोण आहे हे विधानसभा येईल तेव्हा सगळ्यांना दिसेलच. काँग्रेस विरोधी पक्षात आहे. उद्धव ठाकरेंबरोबर जे सदस्य आहेत ते विरोधी पक्षात आहेत. पवारसाहेबांबरोबर आम्ही जे लोक आहोत ते विरोधी पक्षात आहोत. संख्या कमी झाली आहे पण आम्ही विरोधातच आहोत.

खातेवाटपाचं कोडं! दादांची भूमिका ठाम, CM शिंदेंसह फडणवीस, पवार दिल्लीत

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube