राज्यातले प्रकल्प पळाल्याचे फेक नरेटिव्ह पसरवू नका; अजितदादांची विरोधकांना तंबी

राज्यातले प्रकल्प पळाल्याचे फेक नरेटिव्ह पसरवू नका; अजितदादांची विरोधकांना तंबी

Ajit Pawar : विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत की राज्यातले प्रकल्प गुजरातला जात आहेत. पण या आरोपांत काहीच तथ्य नाही. कृपा करून चुकीचे आरोप करून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्राचेच नितीन गडकरी केंद्रात मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने 77 हजार 200 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात राज्याचाही हिस्सा राहणार आहे. देशभरात रस्त्यांचं जाळं तयार होत आहे त्याचाही फायदा राज्याला होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज अजित पवार यांनी (Ajit Pawar) विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. राज्यावरील कर्जाची माहिती देताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की राज्यावरील कर्जात वाढ झाली आहे. सन 2024-25 मध्ये 7 लाख 82 हजार 991 कोटींचं कर्ज दिसत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात 10.67 टक्के वाढ दिसत आहे.

‘राज्यावरचं कर्ज वाढलंय हे खरं आहे. मोठमोठ्या देशांवरही कर्ज आहे. असं बोलतोय म्हणजे मी कर्जाचं समर्थन करतोय असं समजू नका. एक राज्य असं  होतं. त्यांना पगार करता आला नाही. एक राज्य तर असं होतं त्यांच्या मागच्या सरकारच्या काळात त्यांना कर्मचाऱ्यांचे पगार करता आले नाहीत. कोणतं राज्य होतं ते? आंध्र प्रदेश. ‘आम्हाला वाटलं गुजरात.’ ‘तुम्हाला काय कायमच गुजरात दिसतं. रात्री बावचळले तरी गुजरातच म्हणता..’ असाही संवाद रंगला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांत रंगला होता.

अजित पवारांकडून मोठी घोषणा, मुंबईसह ‘या’ शहरात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार

राज्य चालवणाऱ्यांनी मोठी स्वप्नं पाहिली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डने अर्थसहाय्य दिले आहे. पाच हजार कोटी रुपये राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणावर खर्च करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना सौर पंप देऊन दिवसा वीज उपलब्ध करुन देणार. राज्य वन ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दीष्ट निश्चित गाठणार आहे. तूट कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महसुली उत्पन्नाचा आकडा वाढतोय. जीएसटीमुळे करदाते वाढत आहेत. करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेतले असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.

 

Ajit Pawar शब्द देत नाही, पण दिला तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही; अजितदादांचा मतदारांना शब्द

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube