Video : फडणवीसांची रिप्लेसमेंट होणार?, शिंदेंची शाहांना मोठी ऑफर; राऊतांचा खळबळजनक दावा

  • Written By: Published:
Video : फडणवीसांची रिप्लेसमेंट होणार?, शिंदेंची शाहांना मोठी ऑफर; राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut On Eknath Shinde Delhi Visit : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठं विधान केले आहे. राऊतांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एखदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आमचा गट भाजपात विलिन करू पण, मला सीएम करा असे शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात शहांना सांगितल्याचे राऊतांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काल दिल्लीवारीवर असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची तक्रार केल्याचा टोलादेखील राऊत यांनी लगावला. फडणवीस आमची अडचण करत असून, आम्हाला ते काम करू देत नसल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.

Video : थोडं वाचतं चला; भाषावादात ब्रिजभूषण सिंह यांचं राज ठाकरेंच्या शिक्षणावर बोटं

राज्यात मराठी एकजूट उपाय काय?

महाराष्ट्रात मराटी माणसांची एकजूट झाली आहे. ती अधिकाधिक भक्कम होईल. त्याचा त्रास आम्हाला होईल. मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, यावर दोघांमध्ये खल झाला. मराठी माणसाची एकजूट तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठे नुकसान होईल असे शिंदेंनी शाहंनी सांगितले. त्यावर तोडगा काय असे  शाहंनी विचारले. त्याला उत्तर देताना शिंदेंनी मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपा असून, मी मुख्यमंत्री झाल्यास हे सर्व थांबवू शकतो असे सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. पण, त्यावर शाहंनी मुख्यमंत्री तर भाजपचाच असेल असे सांगतिले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपण आपल्या गटासह भाजपामध्ये विलीन होण्यास तयार असून, पण मला मुख्यमंत्री करा असे शिंदेंनी शाहंना सांगितल्याचा दावा राऊतांनी केला आहे. ही भूमिका शिंदेंनी यापूर्वीदेखील वारंवार सांगितली आहे आणि काल पुन्हा एकादा शिंदेंनी याचा पुनुरूच्चार केल्याचे राऊत म्हणाले.

शाहांच्या चरणावर शिंदेंनी डोकं ठेवलं

काल गुरूपौर्णिमेनिमित्त त्यांनी अमित शाह यांचे पाद्यपूजन केले. त्यांच्या पायावर डोके ठेवल्याचा टोला त्यांनी लगावला. आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्यांचा व्हिडिओ माझ्याकडे असून, संबंधित मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत. त्या व्हिडिओमध्ये नोटांची बंडलं दिसत असल्याचेही राऊत म्हणाले. मात्र, एखाद दुसरा नेता वगळता, शिंदेंना कुणी संरक्षण देत नसेल असे म्हणत, सत्तेचं संरक्षण तात्पुरता असतं, कारवाईला सामोरं जाव लागतं असे सूचक विधानही यावेळी बोलताना राऊतांनी केले.

…तर तुमचा पी. चिदंबरम होईल, जयंत पाटलांचा हसतहसत पण गंभीर इशारा

बदनामीचा केविलवाणा प्रयत्न – सामंत

राऊतांच्या खळबळजनक दाव्यानंतर एकीकडे राजकीय वर्तूळात विविध चर्चांनी जोर धरला आहे. तर, यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, संजय राऊत हे अंतरज्ञानी आहेत हे आज समजलं. शिंदे अमित शह यांना भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? मुख्यमंत्री व्हायला कुवत आणि धमक लागते. शिंदे यांनी उठाव केल्याने त्यांना जखम झाली आणि विधानसभेत जिंकल्यानंतर त्यांची जखम वाढल्याचे सांगत राऊतांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. शिंदेंवर वारंवार टीका करून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असून शिंदे हे हत्तीसारखे चालतात आणि विरोधक केवळ भुंकायची कामं करतात असे सामंत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube