‘उद्धव ठाकरे तर बाळासाहेबांच्याच नावाला कलंक’; रवी राणांचा घणाघात
Ravi Rana replies Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध भाजप कार्यकर्ते करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेतेही ठाकरेंवर तुटून पडले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
राणा म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव उंच करण्याऐवजी त्यांचे नाव खाली आणण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. उद्धव ठाकरेच बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला कलंक आहेत, असा आरोप आ. राणा यांनी केला. मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी लोकांना उपेक्षित ठेऊन राज्याला कलंक लावण्याचे काम केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर आरोप करताना दहा वेळा विचार केला पाहिजे, असेही राणा म्हणाले.
15 दिवसांत ‘ते’ लोकं साहेबांकडे फिरणार, आमदार रोहित पवारांचं मोठं विधान…
काय म्हणाले होते ठाकरे?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नागपूर येथे भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हे नागपूरला लागलेले कलंक असल्याची टीका केली होती. यानंतर भाजपकडून त्यांना जोरदार उत्तर देण्यात आले. नागपूर येथे भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील पत्रकार परिषदेत कलंकित करंटा असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावर आता उद्धव ठाकरेंनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “कलंक शब्द वापरला तर तळपायाची आग मस्तकाला जाण्याची गरज काय? तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताना भ्रष्टाचाराचा कलंक नाही का लावत तुम्ही? हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर उतरून आक्रोश केला होता. तेच हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. मला आज कळलं यांनाही मांडी आहे. तेही दुसऱ्यांच्या मांडीला मांडी लावत आहेत. तुम्ही म्हणाल तर तो भ्रष्ट आहे, आणि मग त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान देता. तुम्ही म्हणाल तर तो भ्रष्ट, नाहीतर तो देव.”
बावनकुळेजी, आधी ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या; ठाकरे गटाच्या नेत्यांनं दिलं आव्हान
फडणवीसांचंही उत्तर
आमचे आजचे विरोध आणि माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फारच विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी आता मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा, असा उपरोधिक टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.