‘त्या’ अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला का नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला रोखठोक सवाल

‘त्या’ अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला का नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला रोखठोक सवाल

Dr. Pradeep Kurulkar : हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकून पाकिस्तानी हेर महिलेला देशाच्या संरक्षणविषयक माहिती पुरविणाऱ्या डीआरडीओच्या संचालक प्रदीप कुरुलकरविरोधात देशद्रोहाचा खटला का लावण्यात येत नाही, असा सवाल काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. विधीमंडळ अधिवेशनातही काल त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

‘त्या’ अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला का नाही चालवत? जयंत पाटलांचा खडा सवाल…

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चव्हाण यांनी सरकारला सवाल केला. ते म्हणाले, कुरुलकर याने देशाची संरक्षणविषयक गुप्त माहिती पाकिस्तानी हेर महिलेला दिली होती. त्यामुळे संरक्षण खात्याने त्यांच्यावर खटला दाखल केला आहे. हा खटला एटीएसच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. या खटल्यात बचाव करताना कुरुलकरच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की जी माहिती पाकिस्तानी महिलेला दिली गेली होती ती माहिती गुप्त नव्हती. सार्वजनिक झालेली होती. त्यामुळे या व्यक्तीला या प्रकरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी शंका मी उपस्थित केली होती.

प्रदीप कुरुलकर हा संरक्षण खात्याच्या महत्वाच्या प्रयोगशाळेत होता. येथे त्याची महत्वाच्या पदावर नेमणूक झाली होती. त्याच्यावर फक्त गुप्ततेच्या कायद्याचे भंग केल्याचं कलम लावण्यात आले आहे. या व्यक्तीविरुद्ध युएपीए कायद्याचे कलम का लावले नाही. याच्या विरुद्ध देशद्रोहाचे कलम का लावले नाही, याच्याविरुद्ध एनआयए चे कलम का लावले नाही असे सवाल चव्हाण यांनी केले.

हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. हा काही कुणी खासगी व्यक्ती किंवा राजकीय व्यक्तीने केलेला गुन्हा नाही. या व्यक्तीवर खटला दाखल करून त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. परंतु, पाकिस्तानी गुप्तहेरांचं जाळं किती विस्तृतपणे पसरलं आहे. पाकिस्तानी कशा पद्धतीने अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये फसवतात. या अधिकाऱ्याचे सामाजिक संस्थांची जे संबंध आहेत ते देखील शोधले पाहिजेत अशी आमची मागणी असल्याचे चव्हाण म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube