छगन आप्पा कशाला फडफड करतो? दहा पिढ्या आल्या तरी…; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

छगन आप्पा कशाला फडफड करतो?  दहा पिढ्या आल्या तरी…; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) लढा देणारे मनोज जरागेंनी ओसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजब (Chhagan Bhujbal) हे सातत्याने विरोध करत आहेत. दरम्यान आता मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) भुजबळांवर जोरदार टीका केली. आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, छगन आप्पा कशाला फडफड करतो, अशी टीका जरांगेंनी केली.

‘काँग्रेसमध्ये तीन ते चार आमदार डाऊटफूल’; निवडणुकीआधीच स्वपक्षीय आमदाराच्या वक्तव्याने खळबळ 

बीडमध्ये आज मनोज जरांगेची शांतता रॅलीची सभा झाली. यावेळी बोलतांना जरागेंनी भुजबळांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आमचा विरोध फक्त छगन भुजबळांना आहे. कारण त्यांनीच मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. इतर कोणाचाही विरोध नाही. सामान्य ओबीसींना आम्ही विरोधक मानत नाही. भुजबळांच्या माध्यमातून सगळे ओबीसी नेते एक कऱण्याचं काम सुरू आहे. पण, मी आरक्षण मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं जरांगे म्हणाले.

मागेल त्याला ‘कुणबी’ दाखला म्हणताच धनुभाऊंचे कानं टाईट; जरांगेंनी सांगितलं अंतरवलीतलं खरं 

भुजबळांच्या माध्यातून दंगली घडवायच्या…
मराठ्यांच्या नोंदी रद्द कराव्यात, अशी भुजबळांची मागणी आहे. पण, भुजबळांच्या दहा पिढ्या आलल्या तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार, असं जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाचा धनगर समाजाला कोणताही धोका नाही. फक्त भुजबळ सांगतात म्हणून यांचे नेते आपल्याला विरोध करत आहेत. कारण, राज्यात जातीय दंगली झाल्या पाहिजे, अशी सरकारची इच्छा आहे. सरकारला भुजबळांच्या माध्यमातून जातीय दंगल घडवायची आहे, असा आरोप जरांगेंनी केला.

मला अडाणी म्हणणाऱ्या छगन भुजबळांचा कसा खुट्टा ठोकला, हे त्यांना माहित आहे. गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर येत्या विधानसभेत पुन्हा जिरवणार, असा इशाराही जरांगेंनी दिला.

आमचं हक्काचं आरक्षण द्या, काय व्हायचं ते होऊ द्या. सरकारने फसवणूक केली तर पुन्हा लढा देण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही जरंगे पाटील यांनी केले.

मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली. त्यावरून जरांगेने विरोधकांसह सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, सरकारची राजकीय इच्छाशक्ती आहे तर महाविकास आघाडीवाले आले नाहीत तर मग तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही का?, तुम्हाला द्यायचंचं नाही, असा तर मला संशय यायला लागला आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो पण त्यांना सर्वसामान्य लोकांचा विचार करायचा नाही का? असा सवाल जरांगेंनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज