‘काँग्रेसमध्ये तीन ते चार आमदार डाऊटफूल’; निवडणुकीआधीच स्वपक्षीय आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

‘काँग्रेसमध्ये तीन ते चार आमदार डाऊटफूल’; निवडणुकीआधीच स्वपक्षीय आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषद निवडणुकीसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीने एक (MLC Elections 2024) जास्तीचा उमेदवार दिल्याने चुरस निर्माण झाली आहे. तसेच क्रॉस व्होटिंगचीही भीती निर्माण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष निर्धास्त असतानाच त्यांच्याच पक्षातील आमदाराने गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस पक्षात तीन ते चार आमदार डाऊटफूल आहेत, असा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्यामुळे काँग्रेसमधील असे कोणते आमदार आहेत जे फुटू शकतात याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

MLC Election Results : आज विधान परिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. उमेदवारांना निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. मागील निवडणुकीचा अनुभव असल्याने काँग्रेस, ठाकरे गट सतर्क आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही तगडे प्लॅनिंग केले आहे. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज राहणार आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याचीही भीती आहे. यासाठी खबरदारी म्हणून भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाने आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले आहे. आता हे आमदार मतदानाच्या वेळीच सभागृहात येतील.

काँग्रेसने (Congress Party) मात्र असे कोणतेच नियोजन केलेले नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आम्हाला मार्गदर्शन करतील. नंतर स्नेहभोजन होईल. आमच्या पक्षात तीन ते चार आमदार डाऊटफूल आहेत. ते कोणते आमदार आहेत याची माहिती आमच्याकडे आहे. पक्ष त्यांची योग्य व्यवस्था करील असे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले. गोरंट्याल यांनी असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता हे आमदार नेमके कोण आहेत, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

उद्या मतदान, क्रॉस व्होटिंगची भीती; चार पक्षांना धाकधूक, शरद पवार अन् काँग्रेस टेन्शन फ्री!

या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होणार अशी शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात आहे. त्यात आता काँग्रेसच्याच आमदाराने स्वपक्षातील आमदारांवर शंका उपस्थित केल्याने या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे आता मागील विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने काँग्रेसचे आमदार फुटले त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या निवडणुकीत होणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज