ॲड. धीरज पाटलांकडून आचारसंहितेचा भंग; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, गुन्हा दाखल होणार?
Adv. Dheeraj Patil : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha ELection) पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली. मात्र, आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारी सुरूच आहेत. आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ॲड. धीरज पाटील (Adv. Dheeraj Patil) यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा गंभीर आरोप झाला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. मात्र, त्यानंतरही तुळजापुरात (Tuljapur) मंगळवारी दुपारी धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारावर थेट आरोप केले.
बाजारात वाढणार गर्दी, लवकरच लाँच होणार ‘ह्या’ 5 सर्वात भारी इलेक्ट्रिक कार्स
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, प्रचार संपल्यापासून ४८ तासांच्या आत कोणतेही प्रचार सत्र, सभा किंवा प्रसारमाध्यमांद्वारे प्रचाराची कोणतीही कृती करण्यास मनाई आहे. मात्र, पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर जोरदार टीका केली. ज्यामुळं निवडणूक प्रक्रिया प्रभावीत होण्याचा धोका निर्माण झाला. दरम्यान, प्रकरणाची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी ॲड. धीरज पाटील यांना तत्काळ नोटीस बजावली.
नळदुर्गचा विकास ते स्वतंत्र तालुक्याची निर्मिती, राणा जगजितसिंह पाटलांनी सांगितलं विकासाचं व्हिजन
निवडणूक निर्णय अधिकारी डव्हळे यांनी या नोटीसमध्ये धीरज पाटील यांना विचारण्यात आलं की, आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आपल्यावर गुन्हा का दाखल करू नये? या प्रकरणाचा सविस्तर खुलासा करण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला आहे. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाटील यांच्यावर आचारसंहितेचा भंग झाल्याचा या प्रकरणाकडे निवडणूक आयोग कशा प्रकारे कारवाई करतो आणि याचा पाटील यांच्या उमेदवारीवर काय परिणाम होतो, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
उद्या होणार मतदान
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. उद्या सकाळपासूनच मतदानाला सुरूवात होणार आहे.