अजितदादांच्या आमदाराचा राजकीय संन्यास; वारसदारही ठरला!

अजितदादांच्या आमदाराचा राजकीय संन्यास; वारसदारही ठरला!

Pakash Solanke : आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलीयं. अद्याप निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर केलेली नाही. मात्र, सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याची परिस्थिती आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली असल्याची माहिती समोर आलीयं. एवढंच नाही तर आपला राजकीय वारसदाराचीही घोषणा प्रकाश सोळंके यांच्याकडून करण्यात आलीयं.

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; मुंबईला यलो अलर्ट, राज्यातील इतर जिल्ह्यांत काय परिस्थिती?

बीडमधील माजलगाव मतदारसंघात प्रकाश सोळंके हे विद्यमान आमदार आहेत. पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सोळंके यांनी जाहीर केलंय. सोळंके यांचे पुतणए जयसिंह सोळंके हे आपले राजकीय वारसदार असतील, अशी घोषणा सोळंके यांनी केलीयं. आगामी विधानसभेच्या अनुषंगाने ते सध्या माजलगाव मतदारसंघातील गावांमध्ये दौरा करीत आहेत. याच दौऱ्यादरम्यान, ते एका गावात बोलत असताना त्यांनी निवृत्तीची घोषणा केलीयं. प्रकाश सोळंके यांच्यानंतर जयसिंह सोळंके हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचंही सोळंके यांनी जाहीर केलंय.

अहमदनगर जिल्ह्यातील नद्यांमध्ये विसर्ग वाढला, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जयसिंह सोळंके कोण?
आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके चिरंजीव आहेत. पंचायत समिती उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य अशा अनेक पदांवर जयसिंह यांनी काम पाहिलेलं आहे. यासोबतच राष्ट्रवादी पक्षात युवक जिल्हाध्यक्षपदाचीही त्यांनी जबाबदारी पार पाडलीयं. त्यामुळे आता पुढील निवडणुकीत जयसिंह हेच माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे.

लेट्सअप विश्लेषण : पवार-ठाकरेंची उमेदवार जाहीर करण्याची लगबग; कारणं नेमकी काय?

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापलं होतं. त्यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या कथित संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. यामध्ये मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला होता. त्यानंतर संतापात मराठा आंदोलकांकडून बीडमध्ये जाळपोळ करण्यात आला होता. यामध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

video: मेट्रोमध्येच भिडलं जोडपं; ‘माझ्या आयुष्यातून निघून जा’; एकमेकांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल

त्यानंतर आमदार सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत जाळपोळबाबत भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर दगडफेक आणि वाहनांचा जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेमागे कोणते लोक होते, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याची माहिती दिली. जमावात काळाबाजार करणारे लोक होते. माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक होते. यासोबतच त्यांच्या संस्थेत काम करणारेही काही होते. जे 300 जण आले होते ते तयारीनेच आले होते. त्यांच्याकडे शस्त्रे होती. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी पोहोचविण्याच्या उद्देशाने आले होते, असा गंभीर आरोप सोळंके यांनी केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube