जास्त मुले जन्माला घालण्यासाठी लाडकी बहिणी योजनेसाठीसारखी एखादी स्कीम आणा; ओवैसींचा भागवतांवर पलटवार
Asaduddin 0waisi criticizes Mohan Bhagwat population growth Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त करत हिंदुंनी दोन-तीन मुलांना जन्म दिला पाहिले, असे विधान केले आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin 0waisi) यांनी मोहन भागवत यांना प्रत्युत्तर देत एक सल्लाही दिला आहे. जास्त मुले जन्माला घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सांगून लाडकी बहिण योजनेसाठी एखादी स्कीम आणा, असा टोला ओवैसी यांनी लगावला आहे.
शिक्रापूरमध्ये हत्येचा थरार! दिवसाढवळ्या शिंदे गटाच्या नेत्याची हत्या, आरोपी फरार…
लोकसंख्या घटणे ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की, जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) 2.1 च्या खाली जाते, तेव्हा कोणतीही समस्या नसली तरी तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो. अशा प्रकारे अनेक भाषा आणि समाज नष्ट झाले. लोकसंख्या 2.1 च्या खाली जाऊ नये. आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण 1998 किंवा 2002 मध्ये ठरले होते. पण कोणत्याही समाजाची लोकसंख्या 2.1 च्या खाली जाऊ नये, असंही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. मोहन भागवत म्हणाले, आपल्याला दोन-तीन मुलांची गरज आहे. ही संख्या महत्त्वाची आहे. कारण समाज टिकला पाहिजे. नागपुरातील कठाळे कुलच्या बैठकीत मोहन भागवत यांनी लोकसंख्येबाबत ही चिंता व्यक्त केली.
शरद पवारांचाही प्रतोद, गटनेता ठरला; रोहित पाटील अन् जितेंद्र आव्हाडांवर दिली जबाबदारी
त्यावर छत्रपती संभाजीनगर येथे आलेले औवेसी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभांमध्ये मुस्लिम जास्त मुले जन्माला घालत आहेत, असे सांगितले. हिंदू बहिणींचे मंगळसूत्र हिसकावून, जादा मुले जन्माला घालणाऱ्यांना दिले पाहिजे, असे ते म्हणाले. आता आरएसएसवाल्यांनी लग्न केले पाहिजे. पहिल्यांदा आम्हाला शिव्या दिल्यात आहे. पण मुस्लिम समाजाचा टीएफआर रेट (एकूण जन्मदर) घटला आहे. सगळ्यात टीएफआर दर मुस्लिमांचा पडला आहे. हिंदूचा जन्मदर जास्त आहे. वीस ते पंचवीस वर्षांनी देश म्हातारा झालेल्या असेल. जपान, यूरोपमध्ये असे घडले आहे. त्या ठिकाणी वृद्धांची संख्या जास्त आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणतात जास्त मुले जन्माला घाला. महानगरपालिका, नगरपालिका दोनपेक्षा जास्त मुले असल्यास निवडून लढता येत नाही, तसा कायदा आहे. हा कायदा बदलला जाणार आहे. लाडकी बहिण योजनेसाठी एखादी योजना आणा. जास्त मुले जन्माला घालणाऱ्यांच्या खात्यामध्ये महिन्याला दोन हजार दिले पाहिजे, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.