‘ज्ञानराधा’तून पैसे कधी मिळणार? ठेवीदार चिंतेत; सुरेश कुटे ‘नॉट रिचेबल’
Beed Dnyanradha Multistate Chairman Suresh Kute : बीड जिल्ह्यातील उद्योगपती सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये (Dnyanradha Multistate) ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये अडकले आहेत. तब्बल पाच महिने या मल्टिस्टेटच्या शाखा बंद होत्या. त्यामुळे ठेवीदार हे चिंतेत होते. काही दिवसांपूर्वी शाखा उघडण्यात आल्या. सर्व ठेवीदारांचे पैसे परत केले जातील, असे आश्वासन सुरेश कुटे (Suresh Kute) यांनी दिले होते. ठेवीदारांना टोकन देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात ठेवीदारांना एकही रुपया मिळालेला नाही. तर कुटेंचा आता संपर्कही होत नाही. त्यामुळे ठेवीदार हे आता चिंताग्रस्त झाले आहेत.
‘शिर्डी’त नवं पॉलिटिक्स! खा. लोखडेंना वाढला विरोध; पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे
सुरेश कुटे व त्यांची पत्नी अर्चना कुटे यांचा कुटे ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळे त्यांचे उद्योग आहेत. परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांच्या उद्योग समूहावर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यामुळे कुटे दाम्पत्य हे अडचणीत सापडले होते. त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कुटे यांची ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीच्या शाखा तब्बल पाच महिन्यांपासून बंद होत्या. या सोसायटीच्या शाखा या बीड व नगर जिल्ह्यात आहेत. या शाखाही अडचणीत आहेत. त्यामुळे तब्बल पाच महिने शाखा बंद होत्या. त्यामुळे ठेवीदार हवालदील झाले होते.
मोठी बातमी : ‘फायरब्रॅंड’ नेते वसंत मोरेंचा राजीनामा; साहेब माफ करा म्हणत मनसेला ‘जय महाराष्ट्र’
गेल्या आठवड्यात शाखा उघडण्यात आल्या होत्या. सर्व ठेवीदारांचे पैसे दिले जातील, असे आश्वासन कुटे यांनी दिले होते. त्यावेळेच शाखांमध्ये ठेवीदारांच्या पैशांसाठी रांगा लागल्या होत्या. ठेवीदारांना पैशाचे टोकन देण्यात आले होते. पैसेही आरटीजीएस खात्यात वर्ग करण्यात येतील, असे सांगितले होते. तब्बल आठ दिवसानंतरही पैसे खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. त्यामुळे ठेवीदार हे चिंताग्रस्त आहेत. तर शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे ठेवीदार हे विचारणा करत आहेत. कुटे यांचा संपर्क होत नसल्याने तेही ठेवीदारांना उत्तर देत नाहीत.