Video : पुण्यात आकाची किती संपत्ती?; आकडेवारी सांगत सुरेश धसांनी नवा डाव टाकला

Video : पुण्यात आकाची किती संपत्ती?; आकडेवारी सांगत सुरेश धसांनी नवा डाव टाकला

Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटले. आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभर आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. आज पैठण शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आकावर जोरदार हल्लाबोल केला.

आकांनी भरपूर माल जमा केला आहे. आका अंबानींनाही मागे टाकतील की काय अशी शंका मला येत आहे. आकांकडे जे लोक काम करतात त्यांच्याही नावावर जमिनी आहेत. पुण्यातील मगरपट्टा भागात आकांनी एक संपूर्ण फ्लोअरच विकत घेतला आहे. या प्रॉपर्टीची किंमत 75 कोटी रुपये आहे. हा फ्लोअर आकाच्या चालकाच्या नावावर आहेत.

मनोज जरांगे, आमदार सुरेश धस अन् संदीप क्षीरसागरांवर गुन्हा दाखल, ओबीसींचं ठिय्या आंदोलन

पुण्यातील एफसी रोड भागात आकाने सात शॉप बूक केली आहेत. यातील एका एका दुकानाची किंमत पाच कोटी रुपये आहे. या दुकानांचे नंबर सुद्धा मी आणले आहेत असा दावा सुरेश धस यांनी मोर्चातील भाषणात केला.

मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार

पोलीस दलातील कर्मचारी जर आकाचं ऐकून काम करत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की सीआयडीतले पोलीस आणि मालिकेतले कलाकारच परळीत नियुक्त करा. ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आजिबात करू नये. मी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्रही देणार आहे असे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी भाषणात सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube