“विरोधकांनो भूमिका स्पष्ट करा, अन्यथा मोठा निर्णय घेऊ”; जरांगेंनी प्रथमच ठाकरे-पवारांना घेरलं

“विरोधकांनो भूमिका स्पष्ट करा, अन्यथा मोठा निर्णय घेऊ”; जरांगेंनी प्रथमच ठाकरे-पवारांना घेरलं

Manoj Jarange Patil Press Conference : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) उपोषण स्थगित करून राज्याच्या दौऱ्याची तयारी केली आहे. राज्य सरकारला निर्णय घेण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha Reservation) राज्य सरकारची कोंडी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच विरोधी पक्षांची कोंडी करणारा सवाल विचारला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) मिळाले पाहिजे की नाही ? यावर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच याबाबत निर्णय न झाल्यास येत्या 29 ऑगस्ट रोजी आपण मोठा निर्णय जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.

Manoj Jarange Patil : ‘माझा पट्टा तुटला तर मग.., मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा

जरांगे पाटील पुढे म्हणाले, आज मूळ गावी मातुरी येथे यात्रेसाठी निघालो आहे. आमचं मूळ गाव आहे. दर्शनासाठी जाणार आहे. सरकारशी कोणतंही बोलणं झालेलं नाही. पाऊस सुरू आहे सरकार त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देणार नाही. पण, येत्या 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढायची की नाही याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत. मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणाच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले.

आपला समाज यांना मोठा करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहोत. भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही. मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल असा इशारा जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. यानंतर त्यांनी राज्याती विरोधी पक्षांच्या धोरणावरही टीका केली. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही अशी मागणी त्यांनी केली.

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांचे उपोषण अचानक स्थगित; पाचव्या दिवशी तब्येत ढासळली

फडणवीसांनंतर जरांगेंचाही सवाल

दरम्यान, याआधी पुण्यातील बालेवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधी पक्षांना हाच प्रश्न विचारला होता. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे की नको असा सवाल फडणवीसांनी यांनी व्यासपीठावरून विचारला होता. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील हाच सवाल विचारून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता या प्रश्नावर महाविकास आघाडीचे नेते काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube