उमेदवारीत डावललं तरीही प्रीतम मुंडेंनी घेतला अर्ज; बीड लोकसभेत नवं पॉलिटिक्स
Beed Lok Sabha Election : बीड लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपने विद्यमान (Beed Lok Sabha Election) खासदार प्रितम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना तिकीट (Pankaja Munde) दिलं आहे. पंकजा मुंडे यांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारात प्रितम मुंडेही दिसत आहेत. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली म्हटल्यानंतर प्रितम यांच्या उमेदवारीचा प्रश्न येत नाही. मात्र तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी डॉ. प्रीतम मुंडे यांनी अर्ज नेल्याची नोंद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाली आहे.
Beed Lok Sabha : बीडच्या मैदानात वंचित आघाडीची एन्ट्री! अशोक हिंगेंची उमेदवारी जाहीर
बीडमध्ये अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. मात्र उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी 39 लोकांनी 92 अर्ज नेल आहेत. यामध्ये खासदार प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे, शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी अर्ज नेल्याची माहिती देण्यात आली. भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली असताना प्रीतम मुंडे यांनी अर्ज नेण्याचे कारण काय असा प्रश्न आता विचारला जात आहे.
प्रीतम मुंडे बीड मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. यंदा त्यांनाच पुन्ह तिकीट मिळेल असे सांगितले जात होते. मात्र त्यांना डावलून पक्षाने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली. राज्याच्या राजकारणातून पंकजा मुंडे दुर्लक्षित राहिल्या होत्या. त्यांना कोणतेच महत्वाचे पद मिळाले नवहते. त्यामुळे पंकजा पक्षात नाराज असल्याचे सांगितले जात होते. लोकसभा निवडणुकीआधी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रातील रिक्त जागांसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होते. परंतु, येथेही त्यांना डावलण्यात आले.
त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले होते. वाढती नाराजी पक्षासाठी धोकादायक ठरू शकते याचा विचार करून अखेर लोकसभेसाठी पक्षाने बीडमधून पंकजांना उमेदवारी दिली. परंतु, त्यांच्या बहिण विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आले. असे असले तरी पंकजा मुंडे यांच्या प्रचारात प्रीतम मुंडे आघाडीवर आहेत. आता त्यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. हा अर्ज त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी नेला की स्वतः उमेदवारी दाखल करणार आहेत, याचं उत्तर थोड्याच दिवसांत मिळेल.
राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; बीडमध्ये बजरंग सोनवणेच तर भिवंडीत म्हात्रेंना उमेदवारी