ठाकरेंच्या शिवसेनेत जायचं होतं पण, उत्तर आलं..; हर्षवर्धन जाधवांनी क्लिप ऐकवत केला खुलासा

ठाकरेंच्या शिवसेनेत जायचं होतं पण, उत्तर आलं..; हर्षवर्धन जाधवांनी क्लिप ऐकवत केला खुलासा

छत्रपती संभाजीनगर :  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षात नुकताच प्रवेश केलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मोठा खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे यांचं चिन्ह ज्या दिवशी काढून घेतलं त्या दिवशी मी खूप भावूक झालो. मी ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मला त्यांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

जाधव यांनी यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री बबनराव घोलप आणि त्यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग ऐकवत हा गौप्यस्फोट केला. ते पुढे म्हणाले, आता बीआरएस पक्षाने सांगितल्यास कन्नड विधानसभा आणि जालना लोकसभा निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे. पक्ष जिथून सांगेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढवू.

वाचा : रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी केला केसीआर यांच्या पक्षात प्रवेश

बॉम्बेचे मुंबई केले पण आक्षेप नाही

नामांतरावरून आक्षेप घेण्याची आता फॅशनच झाली आहे. बॉम्बेचे मुंबई केले त्यावेळी कुणीच आक्षेप घेतला नाही. तुमचं हिंदुत्ववादी सरकार आहे, घ्या निर्णय तुम्हाला कुणी अडवले आहे ?, असा सवाल त्यांनी केला.

खैरेंनाही सपोर्ट केला पण..

भारतीय जनता पार्टीला अडवायचे म्हणून मी ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे यांनाही सपोर्ट केला. मी कन्नडच्या आमदारांना देखील सपोर्ट करायला तयार आहे. पण, नॉट इंटरेस्टेड असे उत्तर आल्याचा दावा जाधव यांनी या पत्रकार परिषदेत केला.

Harshvardhan Jadhav : … तर रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवणार, सासरे-जावई वाद पेटणार

दरम्यान, भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश करताच हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार, असं ते म्हणाले आहेत.

त्याचवेळी त्यांनी कन्नड या आपल्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवणार असल्याच सांगितलं आहे. कन्नड मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव याही निवडणुकीची तयारी करत आहेत, त्यामुळे पती विरुद्ध पत्नी असा सामनाही रंगू शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube