Video : जरांगेंचं ऐकून आमच्या पाठीत खंजीर खूपसला तर…,ओबीसी आंदोलक वाघमारेंचा सरकारला इशारा

Video : जरांगेंचं ऐकून आमच्या पाठीत खंजीर खूपसला तर…,ओबीसी आंदोलक वाघमारेंचा सरकारला इशारा

Navnath Waghmare on Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील (Jarange) पुन्हा एकदा सरकार दरबारी जाणार असून ते लवकरच मोर्चा काढणार आहेत. त्यांनी मोर्चाबद्दल तशी बांधणीही सुरू केली आहे. अनेक जिल्ह्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकाही सुरू केल्या आहेत. मात्र, आता त्यांचे विरोधक आणि ओबीसी आरक्षणाची बाजू मांडणारे नवनाथ वाघमारे यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना जरांगे पाटलांनावर घणाघाती टाका केली आहे.

सरकारने जरांगे यांचं ऐकून आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केल, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सरकारच्या विरोधात काम करू असा इशारा देत वाघमारे थेट सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचसोबत जरांगेची एसआयटी चौकशी लावून त्याला बिनभाड्याच्या खोलीत टाका, त्याच्याशिवाय त्याची ड्युटी बंद होणार नाही असा थेट हल्हाबोल वाघमारे यांनी यावेळई केला आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, दरवाजा तोडून बाहेर काढलं..

जरांगे यांच्या भोवती असलेले हजारो लोक मटका, दारू, वाळूत जेलमध्ये जातील असाही खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. जरांगेमुळे EWS आरक्षण गेलं, त्याला समाजाशी काहीही देणं घेणं नाही, त्याला कायम प्रसिद्धी हवी आहे असा आरोपही वाघमारे यांनी यावेळी केला. सरकारने जरांगे यांचं ऐकून आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सरकारच्या विरोधात काम करू असा इशाराच त्यांनी दिला आहे.

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं? आणि आता काय मिळवायचं? या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसंच 29 ऑगस्टला मुंबईकडे मोर्चा घेऊन जायचं अशी घोषणा केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube