मोदींना आली गोपीनाथ मुंडेंची आठवण! म्हणाले, माझ्याशी बीडच्या विकासाबद्दल बोलायचे

मोदींना आली गोपीनाथ मुंडेंची आठवण! म्हणाले, माझ्याशी बीडच्या विकासाबद्दल बोलायचे

Narendra Modi : गोपीनाथ मुंडे माझ्यापेक्षाही अनुभवी होते. तसेच, अरुण जेटली, सुषमा स्वराज अनुभवी लोक होते. त्यांना सोबत घेऊन मला देशाची सेवा करायची होती असा मी विचार केला होता. मात्र, भाजपचं सरकार येताच काही कालावधीतचं गोपीनाथराव मला सोडून गेले याचं मला आजही दु:ख आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली. ते आज आंबेजोगाई येथे पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

 

मराठवाड्याच्या विकासावर बोलायचे

गोपीनाथ मुंडे कायम बीड जिल्ह्याच्या आणि विशेषत: मराठवड्याच्या विकासाबद्दल माझ्याशी बोलायचे असंही मोदी यावेळी म्हणाले. तसंच, आज मला येथे आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचीच जास्त कमी जाणवते अशी खंतही मोदी यांनी यावेळी बोलून दाखवली. दरम्यान, व्यासपीठावर रामदास आठवले, धनंजय मुंडे, प्रितम मुंडे, सुरेश धस उपस्थित होते.

 

महाराष्ट्रातील 27 प्रकल्प

मराठवाडा 60 वर्षापासून पाण्यापासून वंचित आहे. मात्र, आम्ही मराठवाडा जल ग्रीड परियोजना ठप्प होती. ती पुढे घेऊन जाण्याचं काम राज्यातील युती सराकने केलं असा दावाही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला. तसंच, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून माराष्ट्रातील 27 प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील 10 पूर्ण झाले आहेत. बाकीही लवकरच पूर्ण होतील असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

 

पंकजा यांच्यावर जबाबदारी

यावेळी मोदी म्हणाले, गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर विकासाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जे विकासाचे काम केलं ते करण्याची पूर्ण जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर असून आपण त्यांना अशीर्वाद द्या असं आवाहनही मोदी यांनी उपस्थितांना केलं. तसंच, बीड आणि मराठवाड्यातील अनेक प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे आहेत असंही ते यावेळी म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube