पोलिसांचा नकार तरीही आंदोलक ठाम; मनोज जरांगेसह 425 जणांवर गुन्हा!

पोलिसांचा नकार तरीही आंदोलक ठाम; मनोज जरांगेसह 425 जणांवर गुन्हा!

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांकडून राज्यभरातील विविध जिल्ह्यात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. अशातच आता राज्याच्या गृह विभागाकडून आंदोलकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. बीडमध्ये मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासह 425 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिरुर आणि अंमळनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

नवाज शरीफांची लेक पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी; इम्रान खान यांना धोबीपछाड

मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरु असतानाच जरांगेंनी मराठा बांधवांना रास्तारोको आंदोलन करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानूसार राज्यातील विविध जिल्ह्यांत मराठा बांधवांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमकही झाल्याचं पाहायला मिळत होतं. या आंदोलनासाठी आंदोलकांना पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असतानाही आंदोलकांनी तब्बल 22 ठिकाणी आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत होतं.

‘मला संपवण्याचा डाव’ हे बिनबुडाचं अन् धादांत खोटं; फडणवीसांनी आरोप फेटाळले

मराठा आंदोलकांकडून सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासामुळे पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. पोलिसांकडून बीडमधील तब्बल 425 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर व शिरूर पोलिस ठाण्यात मनोज जरांगे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. जरांगे यांच्या आवाहनानुसार हे आंदोलन झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘मूर्ख आहेत त्या मुली ज्या डेटवर…’, नातीच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन काय बोलून गेल्या?

इंटरनेट सेवा बंद
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरु नयेत म्हणून पोलिसांकडून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 12 ते 5 या वेळेत बंद करण्यात आली होती. बीड व जालना जिल्ह्याची सीमाही सील केली होती. जिल्ह्यात २८ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube