मुंडेवाडीतील ‘तो’ व्हिडिओ जुनाचा, एकाला अटक; गावात कुणावरही सामाजिक बहिष्कार नाही
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर बीडमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. त्या काळात हिंसाचार झाला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) भाजपच्या पंकजा मुंडे((Pankaja Munde) आणि शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांच्यामध्ये लढत झाली आहे. या मतदारसंघात निवडणुकीत जातीय संघर्ष दिसून आला. ओबीसी विरुद्ध मराठा वाद निवडणुकीत दिसून आला. त्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका समाजाने दुसऱ्या समाजावर एकप्रकारे बहिष्कार टाकल्याचा हा व्हिडिओ होता. या व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा व्हिडिओ पंधरा ते वीस दिवसांपूर्वीचा होता. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर (Nandakumar thakur) यांनी या गावाला आज भेट देऊन चौकशी केली. त्यात गावात सामाजिक सलोखा आहे. कुठलाही भेदभाव नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगत असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. (video in mundewadi is old-one-arrested-there-is-no-social-boycott-on-anyone-in-the-village)
आरोग्यमंत्र्यांविरोधात आरोप करणाऱ्या डॉ. पवारांचे निलंबन का झाले ? आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
मुंडेवाडीतील एक व्हिडिओ समाजमाध्यमावर रविवारी व्हायरल झाला होता. एका बैठकीमध्ये एका समाजाने दुसऱ्या समाजावर थेट बहिष्कार टाकण्याची भाषा वापरली होती. त्यात एका विशिष्ट समाजाच्या मेडिकल, चहाची टपरी, दुकानात खरेदी करू नये. त्या समाजातील कीर्तनकारांना सप्ताहासाठी आमंत्रित करून नये, धाब्यावर जेवायला जावू नये, कुणी नियम मोडल्यास त्याला दोन ते पाच हजार रुपयांचा दंड केला जाईल, असे एक जण म्हणत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने याची दखल घेत चौकशी सुरू केली. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या गावाला भेट दिली आहे.
पराभव झाला तरी खचून जाऊ नये; लोकसभा निकालापूर्वीच अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संदेश
याबाबत ठाकूर म्हणाले, तो व्हिडिओ कालच व्हायरल झाला होता. याप्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आले आहे. हा व्हिडिओ जुना आहे. पंधरा ते वीस दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. या गावात 99 टक्के समाज एक आहे. तर दुसरा समाज एक टक्के आहे. एक टक्के समाजाचा सरपंच गावात आहे. या गावात कुठलाही सामाजिक भेद दिसून आला नाही. नांदुरफाटा येथील काही समाजकंटक त्रास देतात म्हणून एक बैठक होती. त्यात एक जण उत्साहाच्या भरात बोलून गेला आहे. पोलिसांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यात गावात एका समाजाकडून दुसऱ्या समाजाचा भेदभाव करणे, दुकानातून खरेदी न करणे असा प्रकार घडत नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. नांदूरफाटा येथे काही दुकानदाराकंडून व्यावसायिक स्पर्धेतून असे प्रकार घडवून आणले आहेत. परंतु मुंडेवाडीत असा प्रकार घडलेला नाही. त्यामुळे जातीयवादाचा प्रश्न येत नाही, असे पोलिस अधीक्षकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
…पण सोशल वॉर
बीडमधील निवडणुकीतील जातीय संघर्षातून मात्र सोशल मीडियावर जोरदार वॉर सुरू आहे. दोन्ही समाजातील तरुण ही सोशल मीडियावर एकामेंकाची बाजू मांडत आहे. तसेच कोणत्या समाज कसा चुकला हेही सांगत आहे. त्याच्या पोस्टही व्हायरल होत आहे. परंतु यावर आता पोलिस यंत्रणाही लक्ष ठेवून आहे. तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्यास गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशाराच पोलिस विभागाने दिला आहे.