Ambulance Scam : सरकारने लूट थांबवावी, अन्यथा जनता नांग्या ठेचेल; रोहित पवारांचा इशारा

Ambulance Scam : सरकारने लूट थांबवावी, अन्यथा जनता नांग्या ठेचेल; रोहित पवारांचा इशारा

Rohit Pawar On Ambulance Scam: राज्याच्या आरोग्य विभागात सहा हजार कोटींचा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा (Ambulance Scam) झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी या घोटाळ्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्यातील 280 कोटींचा अ‍ॅडव्हान्स काढण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला.

साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं, पण त्यांचाच लग्नास नकार; वडेट्टीवारांचा वंचितला टोला 

महायुतीमध्ये सरकारमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा सुरू असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. या घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलचं धारेवर धरलं. त्यानंतर आता रोहित पवारांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, राज्याच्या आरोग्य विभागाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असलेल्या #अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्यात मोठ्या खेकड्याने नांग्या मारण्यास सुरूवात केली असून गेल्या आठवड्यात पुरवठादारामार्फत 280 कोटींचा ॲडव्हान्स काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पत्रकार परिषदेत या घोटाळ्याचं आधीच पोस्टमॉर्टेम केल्यानं अधिकाऱ्यांची आता लगेचच नको, असं सांगत नकार दिल्याचं कळतंय.

राऊत खिचडी घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’; निरुपमांनी आकडेवारीसह सांगितल्या सगळ्या डिटेल्स 

पुढं त्यांनी लिहिलं की, दिवसाढवळ्या डोळ्या देखत हा घोटाळा होत असताना केवळ मोठे #खेकडे सहभागी असल्यानं सरकारमधील बडे नेते आणि सरकारी अधिकारी गप्प असले तरी आम्ही मात्र यात सहभागी सर्व खेकड्यांच्या नांग्या ठेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अधिकाऱ्यांना विनंती की, या घोटाळ्यात भागीदार होऊ नका, अन्यथा खूप महागात पडेल. सरकारनेही ही लूट त्वरीत थांबवावी, अन्यथा जनताही सरकारच्या नांग्या ठेचायला मागं-पुढं पाहणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला.

दरम्यान, रोहित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा आणला होता. हीच बाब त्यांच्या अंगलट आली. या खेकड्याला दोरीने लटकवून अत्याचार केल्याचा आरोप पेटा इंडियाने केला असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल काळसकर यांना पत्र पाठवून रोहित पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube