राऊत खिचडी घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’; निरुपमांनी आकडेवारीसह सांगितल्या सगळ्या डिटेल्स

  • Written By: Published:
राऊत खिचडी घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’; निरुपमांनी आकडेवारीसह सांगितल्या सगळ्या डिटेल्स

Sanjay Nirupam Allegations On Sanjay Raut In Khichdi Scam Case : मुंबईतील खिचडी घोटाळ्याचा खरा मास्टरमाइंड संजय राऊतचं (Sanjay Raut) असून, राऊतांच्या कुटुंबियांकडून एक कोटी रुपयांची दलाली करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केल आहे. यावेळी निरूपम यांनी घोटाळ्यात राऊतांनी आपल्या पत्नी भाऊ आणि मुलीच्या नावाने पैसे घेतल्याचाही दावा केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी निरूपम यांनी अमोल किर्तिकरांसह ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

ईडी, सीबीआयचं नियंत्रण आठ दिवस माझ्याकडं द्या; संजय राऊत कडाडले

निरूपम म्हणाले की, आज 8 एप्रिल असून, उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल किर्तिकरांना खिचडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीने आज बोलवले असून, देण्यात आलेला उमेदवार किती मोठा चोर आहेत हे जनतेला कळलं पाहिजे. संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार असून, पत्राचाळ घोटाळ्यात त्यांनी पत्नीच्या नावे पैसे घेतल्याचे ते म्हणाले.

कुणाच्या खात्यात किती पैसे आले

संजय राऊत यांची मुलगी निकिता हिच्या खात्यात 3लाख 50 हजार, 5 लाख, तीन लाख अशी रक्कम जमा झाली. तसेच संदीप राऊत यांच्या खात्यात 5 लाख, 1 लाख 25 हजार रुपये जमा झाले. सुजीत पाटकर यांच्या खात्यात 14 लाख, 14 लाख, 10 लाख, 1 लाख 90 हजार, 1 लाख 90 हजार जमा झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

सांगली आम्हीच लढणार! विशाल पाटलांनी ठाकरे अन् राऊतांना ठणकावलं; मुहूर्तावर घोषणा होणार?

ईडीने संजय राऊत यांना अटक केली पाहिजे

खिचडी घोटाळ्यात ईडीने राऊतांना अटक केली पाहिजे असे म्हणत हा निर्दयी गुन्हा आहे. शिवसेना जी गरजूंना मदत करत होती अशा शिवसेनेचा झेंडा घेऊन फसवणूक करण्याचे काम राऊतांनी केले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवारही खिचडी चोर असून ज्यांनी त्यांना उमेदवारी दिली तेही चोर आहेत, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. अशा लोकांना पराभूत करा आणि त्यांना घरी बसवा असं आवाहनही निरूपम यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज