साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं, पण त्यांचाच लग्नास नकार; वडेट्टीवारांचा वंचितला टोला

साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं, पण त्यांचाच लग्नास नकार; वडेट्टीवारांचा वंचितला टोला

Vijay wadettiwar on Prakash Ambedkar : आत्तापर्यंत मला काँग्रेसकडू (Congress) आघाडीबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. त्याला आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही पसंत केलं होतं. हुंड्याची चर्चाही करायची होती, पण, त्याआधीच त्यांनी लग्न मोडलं, असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

राऊत खिचडी घोटाळ्याचा ‘मास्टरमाइंड’; निरुपमांनी आकडेवारीसह सांगितल्या सगळ्या डिटेल्स 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यात एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून त्यांची चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. त्यांनी अनेक वंचितकडून उमेदवार उभे केले. आता त्यांनी पटोलेंवर टीका टीका केली. दरम्यान, आज माध्यमांशी बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, साक्षगंध होण्यापूर्वीच आम्ही प्रकाश आंबेडकारंना पसंत करून ठेवलं होतं. पण, त्यांनी लग्नासाठी का नकार दिला. हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होत,त्यासाठी चर्चा करायची होती. पण, त्यांनी लग्न मोडलं, असा चिमटा वडेट्टीवारांनी काढला.

Jar Tar Chi Goshta: ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी; प्रिया बापटच्या आवाजातील नवं गाणं रिलीज 

आंबेडकर काय म्हणाले होते?
आत्तापर्यंत मला काँग्रेसकडून आघाडीबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही हा प्रस्ताव वर्तमानपत्रांपर्यंत आला असावा, असं मला वाटतं. नाना पटोलेंच्या माध्यमातून वंचितला आलेला प्रस्ताव म्हणजे, वरातीमागून घोडे, याचा विचार कोण करतं, अशी टीका आंबेडकरांनी केली.

…म्हणून खडसेंनी भूमिका बदलली
शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परतणार अससल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता खुद्द खडसेंनी आपण कोणत्याही अटी-शर्तींशिवाय भाजपसोबत जात असल्याचं सांगितलं. याविषयी विचारलं असता वडेट्टीवार म्हणाले की, गळ्याला फास लागला, बिचारे काय करणार? या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला असावा, असं वडेट्टीवार म्हणाले.

राणांना जनता धडा शिकवेल
नवनीत राणा शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आणि काँग्रेसच्या मतांमुळे त्या निवडून आल्या. आता राणांची भूमिका बदलली आहे. त्यांना धडा शिकविल्याशिवाय जनता राहणार नाही, वडेट्टीवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज