संविधानकर्ते अन् नेहरूंनाही जमलं नाही ते मोदींनी केलं; आमदार प्रमोद जठरांचं मोठं वक्तव्य

MLA Pramod Jathars bold statement  जठार यांनी नेहरू आणि संविधानाशी संबंधित केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MLA Pramod Jathars Bold Statement 

Modi achieved even framers of Constitution and Nehru could not MLA Pramod Jathars bold statement : विधानपरिषदेत बिनविरोध निवडून आलेले भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक करत विविध राष्ट्रीय विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राम मंदिर, कलम 370 आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करत मोदी सरकारच्या कामगिरीचा गौरव केला.

Mumbai International Film Festival : मायक्रो ड्रामा ही उत्क्रांती, चित्रपटांमधील ‘फास्ट फॅशन’ नव्हे

पुढील काळात पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नवीन संकल्प करून कामाला लागण्याची गरज असल्याचे जठार यांनी म्हटले. गेल्या काही वर्षांत देशात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडल्याचा दावा करत त्यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय हा ऐतिहासिक ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.

नेमकं काय म्हणाले प्रमोद जठार?

मोदी सरकारने 12 वर्षे काम केलं. पुढील 12 वर्षांसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने संकल्प केला पाहिजे. तसेच मोदींनी या 12 वर्षांच्या कारकिर्दित राम मंदीराचा 500 वर्षांपासूनचा खितपत पडलेला प्रश्न सोडवला. काश्मिरमदील कलम 370 ला हात लावण्याची हिंमत कुणातही नव्हती ना नेहरू ना संविधानकर्ते मात्र सत्तर वर्षांनंतर मोदींनी तो प्रश्न एक टाचणी किंवा रक्ताचा एकही थेंब सांडू न देता सोडवला आहे.

कफ सिरपसह सर्व प्रकारची ‘सिरप’ डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

यावेळी बोलताना जठार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि संविधान निर्मितीशी संबंधित व्यक्तींविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. सीमावर्ती सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी भारताच्या संरक्षण धोरणात बदल झाल्याचा दावा केला. तसेच देशातील जवान, शेतकरी, महिला आणि युवकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचेही त्यांनी म्हटले.

मे महिन्यात वाहन विक्रीचा ऐतिहासिक विक्रम; प्रवासी वाहनांच्या विक्रीत 27 टक्क्यांची वाढ, ग्रामीण भागामुळे वाहन विक्रीला बूस्टर !

कोकणातील महत्त्वाकांक्षी मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी या मार्गाचे बहुतांश काम पूर्णत्वाच्या टप्प्यात असल्याचे सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते गोवा प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय भारताच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य करताना जठार यांनी देशाच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थानाचा उल्लेख केला आणि भारताला पुन्हा आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनविण्याची गरज अधोरेखित केली.

follow us