कलम 370 हटवणाराच संविधानाचा रक्षक; मोदी मुंबईतील सभेत कडाडले

कलम 370 हटवणाराच संविधानाचा रक्षक; मोदी मुंबईतील सभेत कडाडले

Campaign Sabha of PM Modi in Mumbai : इंडिया आघाडीकडे काय आहे? असा प्रश्न विचारत माझ्याकडे 10 वर्षाच्या रिपोर्ट कार्ड आहे, आणि पुढच्या 25 वर्षांचा रोडमॅप आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. (PM Modi) ते मुंबईत शिवाजीपार्क येथे आयोजीत प्रचार सभेत बोलत होते.

 

भारत जगातला सर्वात बलशाली देश

जेवढे पक्ष तेवढे पंतप्रधान त्यांच्याकडे आहेत. त्यांची नजर ही महिलांच्या मंगळसूत्रावर आणि मंदिरातल्या सोन्यावर आहे अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी यावेळी विरोधी आघाडीवर केली. तसंच, मुंबईकरांनी बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावं, त्यांचे प्रत्येक मत हे मोदींना जाणार असंही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडणार असून भारत जगातला सर्वात बलशाली देश म्हणून उभारणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

विकसित भारत देऊन जाणार

ज्यांचं वय हे 70 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्या रुग्णालायतील मोफत उपचाराची, जबाबदारी ही मोदीची असेल. भाजप सत्तेत आल्यानंतर मी देशाला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवली, येत्या काळात भारत तिसऱ्या क्रमांकांची अर्थव्यवस्था असणार आहे असंही ते म्हणाले. मी तुमच्या मुलांना एक विकसित भारत देऊन जाणार आहे. त्यासाठी मी 24 तास देशासाठी काम करणार असा दावाही त्यांनी केला.

 

गॅरंटी ही मोदीची

काश्मीरमधून 370 कलम हटवणं हे अनेकांना अशक्य वाटत होतं, आज त्या अशक्यतेला मी गाढून टाकलंय असं म्हणत काँग्रेसने गेल्या 60 वर्षांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचं स्वप्न दाखवलं, पण मी ते करून दाखवलं असंही ते म्हणाले. त्याचबरोबर दहा वर्षांपूर्वी कर्ज मिळणं हे किती अवघड होतं, आज सहजपणे कर्ज उपलब्ध होतंय. आज सर्वसामान्य लोकांनाही कर्ज मिळतंय, त्याची गॅरंटी ही मोदीची आहे असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube