माजी आयुक्तांवर ईडीची कारवाई अन् खासदार राऊतांचे मंत्री भुसेंवर गंभीर आरोप

Sanjay Raut On Dada Bhuse : वसई- विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार (Anil Kumar Pawar) यांच्यावरील ईडीच्या (ED) कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणात राज्याचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अनिलकुमार पवार हे मंत्री दादा भुसे यांचे जवळचे नातेवाईक असल्याचा दावा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, तत्कालीन आयुक्तांच्या नेमणुकीसाठी दादा भुसेंनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आग्रह धरला होता. मात्र भुसेंची इच्छा उद्धव ठाकरेंनी नाही पण शिंदेंनी पूर्ण केली असा दावा खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनिलकुमारांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती अशी प्रतिक्रिया दाद भुसे यांनी दिली आहेे.
दादा भुसे यांचा आग्रह
वसई- विरार महानगर पालिकाच्या तत्कालीन आयुक्तांवर ईडीची धाड पडली आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना त्या पदावर नियमाबाह्यप्रमाणे बसवण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासाठी दादा भुसे यांचा आग्रह होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनिलकुमार यांची नेमणूक व्हावी अशी दादा भुसे यांची भूमिका होती. पण एकनाथ शिंदे यांनी दादा भुसे यांची इच्छापूर्ण केली असं माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले.
ठाकरे मुख्यमंत्री असताना अनिलकुमार यांची नियुक्ती
तर मी राजकारणात येण्यापूर्वीपासून अनिलकुमार नोकरीत आहेत. आता वसई- विरारचा विषय आहे. संजय राऊतांनी व्यवस्थित माहिती घ्याला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनिलकुमार यांची वसई-विरार महानगर पालिकेच्या आयुक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दाद भुसे यांनी दिली. तसेच पवार माझे नातेवाईक असल्याची देखील माहिती दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Video : भारत माझा मित्र, माझ्या विनंतीवरुन युद्ध थांबवलं, ट्रम्प यांचा पुन्हा दावा
तर दुसरीकडे तब्बल 18 तास वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अनिलकुमार पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी तब्बल 1 कोटी 25 लाख रोख रक्कम सापडली आहे. यानंतर ईडीकडून अनिलकुमार पवार यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.