‘जरांगे पाटलांना शुभेच्छा, पण आमची मागणी वेगळी’! नागपूरच्या मुधोजी राजेंनी मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घेतली?

Mudhoji Raje of Nagpur position regarding Maratha reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचे (Maratha reservation) आंदोलन सुरु आहे. आज शनिवार 30 ऑगस्टला जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha reservation) देण्याची मागणी केलीय. त्यासाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव मुंबईत येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत. मराठा आंदोलकांनी ठरवले आहे की, काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही. या सर्व पार्श्वभुमीवर नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे यांनी मराठा आरक्षणाविषयी वेगळी भूमिका घेतली आहे.
…त्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचाही वेळ देणार नाही; जरांगे पाटलांनी शिंदे समितीची ‘ती’ मागणी फेटाळली
नागपूरच्या मुधोजी राजे यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) म्हटले आहे की, “मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, त्यास आमच्या शुभेच्छा. पण, आम्हाला मराठा म्हणून आरक्षण हवं आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठींबा मात्र ओबीसीतून आरक्षण नको. मराठा (Maratha) समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या”, अशी मागणी मुधोजीराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करत मराठा आरक्षणासाठी त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचं काम झाल्याचंही मुधोजीराजेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मुधोजी राजे
मुधोजी राजे म्हटले की, “मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण (Maratha reservation) हवे आहे, त्यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत; मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही विरोध करतो”, असेही मुधोजी राजे भोसले म्हणाले. “देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जे काम केले, ते खरंच कौतुकास्पद आहे. आता, न्यायालयात टिकेल असेच आरक्षण (Maratha reservation) मराठा समाजाला हवे आहे, आणि त्यावर मराठा समाज ठाम आहे”, असे नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी सांगितले.
अमेरिकेच्या फेडरल सर्किट कोर्ट ऑफ अपीलने दिलेल्या निर्णयाचा ट्रम्प टॅरिफवर काय परिणाम होईल?
महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानासह सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन करत आहेत.मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीवर ठाम असुन आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठा बांधव समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन पुढील काही दिवस मुंबईतच मुक्काम करण्याच्या हेतूने तयारीनीशी मैदानात उतरल्याचं सध्यातरी पाहायला मिळत आहे.