ठरलं! मुंबईचा कारभारी लवकरच होणार जाहीर, ‘या’ तारखेला नावाची होणार घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या नव्या महापौराच्या निवडीसाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

  • Written By: Published:
News Photo   2026 02 02T174721.334

मुंबईची महानगरपालिकेचा महापौर कोण या चर्चा सुरूच आहे. (BMC) या पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली जात होती.

मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर; 170 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत होणार

मुंबई पालिकेच्या निवडणुकीमुळे या दोन्ही भावांच्या युतीची ऐतिहासिक घटना घडली. परंतु या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असतानाच आता मुंबईच्या महापौरपदी नेमकं कोण बसणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. ही उत्सुकता आता संपलेली आहे. कारण येत्या 11 फेब्रुवारी रोजी मुंबईकरांना त्यांचा नवा महापौर मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या नव्या महापौराच्या निवडीसाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी करण्यात येत आहे. या निवडीसाठी येत्या 6 फेब्रुवारी रोजीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. त्यानंतर महापौर कोण होणार हे स्पष्ट होईल.

कुणाची किती संख्या?

भाजप – ८९
शिवसेना ठाकरे गट – ६५
शिवसेना – २९
काँग्रेस – २४
मनसे – ६
एमआयएम- ८
एनसीपी – ३
एसपी – २
एनसीपी शप – १

follow us