Mock Drill In India : देशात उद्या युद्धसराव; पुण्यासह 16 शहरांत सायरन वाजून काळोख होणार!

Nationwide Mock Drill : भारतात उद्या (दि.7) होणाऱ्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशाचं या मॉक ड्रिलकडे (MockDrill In India) लक्ष आहे. हल्ल्याला तोंड देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले असून, राज्यात पुणे, मुंबईसह 16 शहरांमध्ये मॉक ड्रील केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मॉकड्रीलसाठी फडणवीस सरकार हायअलर्ट मोडवर
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या निर्देशांनंतर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट (Maharashtra Government) मोडवर गेले असून, सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या (दि.7) मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ला; मदत मागायला गेलेला पाकिस्तान स्वतःच अडकला; सुरक्षा परिषदेने झाप-झाप झापलं….
महाराष्ट्रातील पुढील 16 ठिकाणी होणार मॉकड्रील
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. छ. संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंंधुदुर्ग
राज्यातील तीन शहरं अतिसंवेदनशील
राज्यात उद्या होणाऱ्या मॉकड्रीलसाठी तीन शहरं अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ज्यात मुंबई, उरण (जिल्हा रायगड) आणि तारापूरचा (जिल्हा पालघर) समावेश असून, या तिन्ही शहरांना पहिल्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. तर दुसऱ्या श्रेणीमध्ये ठाणे, पुणे आणि नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, थळवायशेत, पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. तर, श्रेणी तीनमध्ये छ.संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
मॉकड्रील म्हणजे नक्की काय?
१९७१ च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल करण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थितीमुळे केंद्राने सर्व राज्यांना मॉक ड्रील करण्याचे निर्देश दिले आहेत. या मॉक ड्रीलमध्ये नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा, ते ट्रेनिंग दिलं जाणार असून, सिविल डिफेंस म्हणजे नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या मॉक ड्रीलमागे उद्देश आहे.
Video : वाजपेयींना सर्व घाबरायचे, मोदींना कुणी घाबरत नाही; पहलगामवरून जरांगेंनी पेटवला नवा वाद
मॉकड्रीलदरम्यान कुठे वाजणार सायरन?
– प्रशासकीय भवन
– सरकारी भवन
– पोलीस मुख्यालय
– अग्निशमन दल केंद्र/ मुख्यालय
– लष्करी तळ
– शहरातील मोठे बाजार
– गर्दीची ठिकाणं
मॉकड्रीलमध्ये काय होणार?
मॉकड्रीलमध्ये गृह मंत्रालयाने पाच गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत.ज्यामध्ये हवाई हल्ल्या झाल्यास सायरन वाजवून नागरिकांना अलर्ट करणे. हल्ला झाल्यास नागरिकांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं? याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे.
Video : पहलगामच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याची आत्महत्या; व्हिडिओ होतोय व्हायरल
रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर ब्लॅकआऊट कसे करायचे?
हल्ल्यावेळी काही पडझड अथवा दुखापत झाल्यास जखमींवर उपचार कसे करायचे हे सांगितले जाणार आहे. तसेच हल्ल्यावेळी नागरिकांचे स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव केला जाणार आहे.
सायरन वाजल्यावर काय करालं?
मॉकड्रीलवेळी सायरन वाजल्यानंतर घाबरुन जाऊ नका. तर, 5 ते 10 मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. मोकळ्या जागेपासून लांब राहण्यासोबतच आपतकालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी घरात आणि सुरक्षित इमारतींमध्ये प्रवेश करा.