Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षानंतर वळसे पाटील यांनी दिला नार्वेकर यांना ‘हा’ सल्ला

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षानंतर वळसे पाटील यांनी दिला नार्वेकर यांना ‘हा’ सल्ला

Dilip Walse Patil On Rahul Narwekar :  सुमारे 11 महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जो निर्णय दिला आहे तो एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय वस्त्रातील ताण्या-बाण्यांबाबत परखड भूमिका मांडतो,  अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.  राजकीय पक्षांची फाटाफुट करताना भारतीय जनता पक्षानेजी नीती राबवली त्याबाबत तीव्र टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे, असे ते म्हणाले आहेत.

विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी त्यावेळी श्री. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविली आहे. तसेच शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाने फुटीर कारवायांनंतर आपणच मूळ पक्ष असल्याचे सिद्ध करणे हा प्रयत्नही गैरलागू ठरविला आहे. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या उत्साही राजकीय भूमिकेवरही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहे.

सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी पुन्हा काढली अजित पवारांची खोडी

परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनावश होऊन दिलेल्या ऐच्छिक राजीनाम्याच्या तांत्रिक मुद्द्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या राजकीय परिणामांबाबत संदिग्धता निर्माण झाल्याचे दिसते. यापुढे अपात्रतेच्या निर्णयावर विद्यमान अध्यक्षांना विवेक बुद्धीने निर्णय घ्यावे लागणार आहे. त्यांच्या निर्णयावर पक्षीय राजकारणाचा प्रभाव पडू नये, ही सुयोग्य अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो, असे म्हणत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सल्ला दिला आहे.  एकूणच महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीत नैतिकतेचे अधिष्ठान राहणार की नाही हा कळीचा मुद्दा राहणार आहे.

Video : तुम्ही नैतिकतेवर बोलूच नका, फडणवीसांनी ठाकरेंना फटकारले

दरम्यान, या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद एरवी मी बघत नाही. पण आज शेवटचं थोडं मला बघायला मिळालं. ते म्हणाले की नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. माझा त्यांना सवाल आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत बसलात तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करून ठेवली होती? नैतिकतेबद्दल त्यांनी बोलू नये. त्यांनी खुर्चीसाठी विचार सोडला. एकनाथ शिंदेंनी विचारासाठी खुर्ची सोडली. उद्धवजी, तुमच्या लक्षात आलं होतं की तुमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे त्या लाजेपोटी आणि भीतीपोटी तुम्ही राजीनामा दिलात. त्यामुळे विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलाचा चढवण्याचा प्रयत्न करू नका अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरेंना फटकारले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube