जयंत पाटलांना कुणाची काळजी?; म्हणाले 2024 पर्यंत…

जयंत पाटलांना कुणाची काळजी?; म्हणाले 2024 पर्यंत…

Jayant Patil :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी घेतले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर जयंत पाटील यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे.

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवारांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यानंतर अनेक कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी शरद पवारांच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, नरहरी शिरवळ या सर्वांना अश्रू अनावर झाले. पण यानंतर अजित पवार यांनी बोलताना हा निर्णय आपल्याला माहित होता असे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कोणाच्या हातात दिली जाणार याविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

‘भाजप कोणताही राजकीय व्यभिचार करू शकतो’ ; चिडलेल्या राऊतांचे सणसणीत उत्तर

याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मी सध्या प्रदेशाध्यक्ष आहे. मला व माझ्या सहकाऱ्यांना सर्वात जास्त काळजी 2024 साली होणाऱ्या विधानसभेची आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूका होईपर्यंत पवार साहेब जर अध्यक्ष राहिले तर पक्षातील सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील, असे ते म्हणाले आहेत. या त्यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा व्हायला लागली आहे.

‘मी अध्यक्ष होणार नाही’; सुप्रिया सुळे यांचा दुसरा मार्ग देखील मोकळा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार व जयंत पाटील यांच्यामध्ये विसंवाद असल्याचे अनेकवेळा बोलले जाते. दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचा एक गट पक्षामध्ये मानला जातो. तर अजितदादांचा देखील आपला असा एक ठरावीक आमदारांचा गट पक्षामध्ये सक्रीय आहे. त्यामुळेच जयंत पाटलांना आपल्या पक्षातील भविष्याची चिंता लागून राहिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये केली जात आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube