‘मला बोलवण्याची गरज वाटली नसेल’; नाराजीच्या मुद्द्यावर जयंत पाटील थेट बोलले
Jayant Patil On Sharad Pawar Retirement : जयंत पाटील यांना आजच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यावर त्यांनी भाष्य केले आहे. मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण असलचं पाहिजे, असा आग्रह आपण करु नये, असे ते म्हणाले आहेत. तसेच बैठकीला बोलवले नसल्याने जयंत पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. मी पक्षावर नाराज नाही व पक्षदेखील माझ्यावर नाराज नाही, असे ते म्हणाले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी नव्या नेतृत्वावर बोलायला नकार दिला आहे.
याआधी जयंत पाटील यांनी देखील राजीनामा दिला आहे, अशी चर्चा सुरु होती. त्यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. मी कोणताही राजीनामा दिलेला नाही. तसेच मला शरद पवारांच्या निवृत्तीविषयी काहीही माहित नव्हते. माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नव्हती. तसेच हा निर्णय इतरांना माहित असेल पण मला माहित नव्हती, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे.
Ajit Pawar यांच्या राक्षसी स्वप्नापायी शिवसेना फुटली, रामदास कदमांचा गंभीर आरोप
या पक्षात पवार साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून आम्ही आलो. त्यांनी आम्हाला प्रेम दिलं, पक्षात काम करण्याची संधी दिली. त्यामुळे राज्यातील पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता पवारांच्या साहेबांच्या या निर्णयाने नाराज झाले आहेत, असे पाटील म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी नवीन नेतृत्वावर बोलणे टाळले आहे. एकत्रीत पक्ष काय निर्णय घेतोय ते पाहणे महत्वाचे राहणार आहे.
भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर; भंडारी उपाध्यक्ष, मोहोळ सरचिटणीस
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटनीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आव्हाडांनी राजीनामा दिला आहे. पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.