शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही; आव्हाडांची सदगुरूंवर टीका

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T125100.001

Jitendra Awhad On Sadagrur :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी ईशा फाउंडेशनचे  जग्गी वासुदेव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो, असे त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.

जग्गी वासुदेव याने छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अँनिमेशन) प्रसारित केली आहे ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरु होता; रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले; रामदासाच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा घेवून भिक्षा मागू लागले; पुढे रामदासाने स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देवून त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Nitesh Rane : सर्वात मोठा दलाल आज बारसूमध्ये आलाय, राणे बंधूंची उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी

छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, जग्गी वासुदेव यांना सर्व लोक सदगुरु  या नावाने ओळखतात. ईशा फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत. सोशल मीडियावर त्यांची मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या भाषणांमुळे ते कायम चर्चेत राहत असतात. आता त्यांच्यावर आव्हाड यांनी टीका केली आहे.

Tags

follow us