पवारांवरील टीकेला उत्तर द्यायचा ठेका अजितदादांनीच घेतलाय का?; रोहित पवारांचे नेत्यांना खडेबोल

पवारांवरील टीकेला उत्तर द्यायचा ठेका अजितदादांनीच घेतलाय का?; रोहित पवारांचे नेत्यांना खडेबोल

Rohit Pawar Attack :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व पवार घराण्याचे तिसऱ्या पिढीतील नेते रोहित पवार यांनी पक्षातील नेत्यांनाच खडेबोल सुनावले आहे. शरद पवारासाहेबांवर काही जण खालच्या पातळीवर टीका करतात तेव्हा फक्त अजित पवार हेच बोलतात. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बोलत नाहीत, असे म्हणत त्यांनी पक्षतील नेत्यांनाच सुनावले.

काही नवीन नेते आज महाराष्ट्रात तयार झाले आहे. खालच्या पातळीवर जावून बोलून पदाची अपेक्षा त्यांच्या नेत्याकडून ते करत असावे. जेव्हा एखाद्या पक्षाचे खासकरुन भापपचे स्वयंघोषित नेते खालच्या पातळीवर जावून जेव्हा बोलतात अन् वरचे नेते जेव्हा शांत बसतात तेव्हा खालच्या पातळीच्या राजकारणाला मोठ्या नेत्यांचं पाठबळ असल्याचे आपल्याला दिसतं, असे ते म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारचं ‘हम करे सो कायदा’, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अजित पवार आक्रमक…

सुधीर मुनगंटीवार साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती. पण पवार साहेबांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. अनेक नेत्यांनी पद भूषवली. जेव्हा पवारसाहेबांवर एखादा खालच्या पातळीवर जावून बोलतो तेव्हा फक्त कार्यकर्तेच बोलतात. तेव्हा मला सुद्धा खंत वाटते. ज्या नेत्यांनी पदं भुषवली ते नेते याबाबत काहीही बोलत नाही. फक्त अजितदादाच याबाबत बोलले बाकी कोणीही नेता बोललेला नाही. मला एवढेच सांगायचे आहे की, आम्ही कार्यकर्ते लढत राहू, पण नेते अशा प्रकरणावर का गप्प बसतात ते कळत नाही, असे म्हणत त्यांनी पक्षातील नेत्यांवर आगपाखड केली आहे.

Mla Ram Shinde: शिंदे यांच्यावर आता झारखंडची मोठी जबाबदारी

दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना शरद पवार व रोहित पवारांवर जहरी टीका केली होती. त्यानंतर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता पक्षातील इतर कोणी नेते बोलणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube