NCP च्या आमदारांना माझाचं व्हिप लागणार; आव्हाडांचं अजितदादांना चॅलेंज

  • Written By: Published:
NCP च्या आमदारांना माझाचं व्हिप लागणार; आव्हाडांचं अजितदादांना चॅलेंज

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) थेट बंडखोरी करून आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना आज राज्यपाल रमेश बैस यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि प्रतोपदी नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर लगेच आव्हाडांनी पत्रकार परिषदे घेत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच NCP च्या आमदारांना माझाचं व्हिप लागणार असा इशारा यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना दिला. (NCP MLAs will need my whip; Ahavada’s challenge to Ajit Pawar)

जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदे बोलतांना सांगितलं की, बंडखोर आमदारांनी असचं काही करायची गरज नव्हती. या लोकांना पवारांनी मंत्रिपद दिले. आणखी काय द्यावं? असा सवाल करत आव्हाड चांगलचे संतापले. शरद पवारांकडे तुम्हाला पदांसाठी जावंही लागलं नाही. तर त्यांनीच फोन करून तुम्हाला मंत्रीपदं देऊ केली आणि अशा बाप माणसाला त्याच्या उतारत्या वयात हे दिवस दाखवणं, त्या बापाला अशा परिस्थितीत आणणं हे माणूसकीला शोभणारं नाही. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात एक दु:खाची छटा असेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

यानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाकडे आहे, असं विचारल्यावर आव्हाड म्हणाले, सध्या राष्ट्रवादी पक्ष शऱद पवारांकडेच आहे. शरदचंद्र पवार हे एकच राष्ट्रवादीचे नेते आहेत. प्रदेशाध्यक्ष पद हे जयंत पाटलांकडे आहे आणि जयंत पाटलांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेते पदावर नियुक्ती केली त्यामुळं मी जो व्हिप काढेल, तोच लागू व्हाईल. अवघड स्थितीकडे संधी म्हणून पाहावं लागेल, असं आव्हाड म्हणाले. दरम्यान, मी पवारांना सोडून कोठेही जाणार नाही. सरकारसोबत जाण्यासाठी मला कोणीही विचारलं नाही. मी मेलो तरी शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचं आव्हाडांनी सांगिलतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube