Nitin Gadkari Threat : धमकी प्रकरणाचं गूढ वाढलं, बंगळुरुमधून तरुणीला घेतलं ताब्यात

Nitin Gadkari Threat : धमकी प्रकरणाचं गूढ वाढलं, बंगळुरुमधून तरुणीला घेतलं ताब्यात

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला फोनद्वारे आलेल्या धमकी प्रकरणाचं गुढ आणखी वाढलं आहे. या प्रकरणी एका तरुणीला मंगळूरु पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपासासाठी नागपूरहून कर्नाटकात रवाना झाली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा जाणार? निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी आता राष्ट्रवादीवर

पोलिस आयुक्त कुमार म्हणाले, मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आलेल्या धमकीच्या फोन प्रकरणी ज्या तरुणीचा नंबर देण्यात आला होता तिला ताब्यात घेण्यात आलं असून सध्या ती रुग्णालयात दाखल आहे. मात्र, हा धमकीचा फोन नेमका कोणी? याचा तपास सुरु असल्याचं कुमार यांनी सांगितलं आहे.

IND vs AUS, 3rd ODI : ऑस्ट्रेलिया रोखणार विजयाचा रथ? तिसरी मालिका खिशात घालण्याची भारताला संधी

तसेच या तरुणीची आधीपासून तब्येत बिघडलेली होती. आणि ती आधीपासूनच रुग्णालयात दाखल आहे. या तरुणीचे मित्र जेलमध्ये होते ते आता बाहेर सुटले असल्याचंही अमित कुमार यांनी स्पष्ट केलंय.

शासकीय निवासस्थानी ‘गुढी’ उभारत अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छा…

प्रथमदर्शनी तपासात धमकीचा फोन हा जेलमधूनच आला असल्याचं उघड झालं असून याबाबत अधिक तपास पोलिसांचं पथक करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

याआधीही एकदा गडकरी यांना जयेश पुजारी या नावानेच धमकी आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने 10 कोटींच्या खंडणीची मागणी केली असून खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube