अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचा मार्ग मोकळा ! नामांतराबाबत महापालिकेचा ठराव

  • Written By: Last Updated:
अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचा मार्ग मोकळा ! नामांतराबाबत महापालिकेचा ठराव

Ahmednagar corporation resolution regarding city name change: अहमदनगर शहराचे (Ahmednagar) नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर (Punyashloka AhilyaDevinagar) करण्याचा ठराव अखेर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Corporation) महासभेने मंजूर केला आहे. महापालिकेची मुदत संपलेली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हे सध्या प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे.

सतरा हजार पोलिस भरतीपासून मराठा आरक्षणाचा आरंभ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

हा ठराव आता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा होऊन अनेक महिने झाले आहेत. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर झाले आहे.

LokSabha election: महादेव जानकर माढ्यातूनच लोकसभा लढविणार; रासपच्या नेत्याने सांगितलं ‘प्लॅनिंग’

परंतु अहमदनगरच्या नामांतराची घोषणा झाली. परंतु पुढील प्रशासकीय कार्यवाही रखडलेली होती. शहराच्या नामांतरासाठी महानगरपालिकेच्या महासभेचा ठराव गरजेचा होता. परंतु तो ठराव होऊ शकला नाही. तोपर्यंत नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळेही महासभाही होऊ शकले नाही. नामांतरच्या ठरावाबाबत नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. यात नगर महापालिकेतील महासभेतून नामांतराचा प्रस्ताव मांडण्यास सांगितला होता. तसेच या नामांतरासाठी रेल्वे व पोस्ट यांचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच जिल्ह्याचे नाव बदलण्याबाबतची अनुशंगिक माहिती मागविली होती.

नगर महापालिकेत २८ डिसेंबर २०२३पासून प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे स्थायी समिती व महासभेतील ठरावांना मंजुरी तेच देत आहेत. अशातच त्यांनी आज नगर शहराच्या नामांतरावर महासभा घेतली. या महासभेत नगर शहराच्या नामांतराला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नाशिकच्या विभागीय आयुक्त व राज्य सरकारला कळविण्यात आले आहे.

आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होईल. त्या काळात नामांतराबाबत राज्य सरकारला काहीच निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे आता महानगरपालिकेकडून तातडीने हा ठराव राज्य सरकारने मागविला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच नगरचे नामांतर होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज