“मला पाडायचं असेल तर जामनेरात मुक्कामी राहा अन्..” महाजनांचं चॅलेंज कुणाला ?

“मला पाडायचं असेल तर जामनेरात मुक्कामी राहा अन्..” महाजनांचं चॅलेंज कुणाला ?

Girish Mahajan Challenges Eknath Khadse : राज्याच्या राजकारणात गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील संघर्ष नवा राहिलेला नाही. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत विरोधामुळेच भाजपप्रवेश रखडल्याचे एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याला गिरीश महाजन यांनीही उत्तर दिले होते.

आता तर विधानसभा निवडणुका आल्याने हा राजकीय संघर्ष अधिक टोकदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गिरीश महाजन यांनी थेट जामनेरात येऊन चॅलेंज दिलं आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेरात महाजन यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी निवडणुकीवर भाष्य केलं. मला पाडायचं असेल तर जामनेरला मुक्कामी राहा आणि मला पाडून दाखवा असं आव्हान त्यांनी एकनाथ खडसे यांना दिलं.

एवढी लाचारी मी आजवर पाहिली नाही, मला खडसेंची कीव येते; गिरीश महाजनांची खोचक टीका

मंत्री महाजन यांनी या सभेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली. तुमच्या बोदवडला महिना महिना पाणी मिळत नाही. आधी तेथील पाण्याची टंचाई सोडवा मग विकासाच्या गप्पा मारा असे महाजन म्हणाले. 2020 मध्ये ज्यावेळी खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हाच्या भाषणात माझ्या मागे ईडी लावली जाईल असे सांगितलं होतं.

तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही त्यांनी सांगितलं होतं. यावर महाजन म्हणाले, काय फालतू पांचटासारखं नेहमी तेच तेच बोलता. त्यांना आम्ही म्हटलं नार्कोटिक्स करून घ्या. फक्त तुमचीच नाही तर माझी पण टेस्ट करा. इंजेक्शन दिलं की माणूस खरं काय खोटं काय ते सांगतो. आहात का तयार. म्हणे माझ्याकडे सीडी आहे मग कुठे आहे सीडी असा सवाल गिरीश महाजन यांनी केला.

ज्यांना स्वचःची ग्रामपंचायत जिंकता येत नाही त्यांनी तर जामनेरच्या विकासावर बोलूच नये. एकनाथ खडसे यांचं आता काय राहिलं आहे त्यांच्याकडे ना जिल्हा बँक आहे ना दूध संघ. सर्व माझ्यामुळे माझ्यामुळे असं जो करतो त्याचं कसं गर्वहरण होतं हे लक्षात आलं असेल. त्यातही हा जामनेर तालुका आहे. कितीही भाषणं करा इथे तुमची डाळ काही शिजणार नाही. तुम्ही मंत्री असताना काय केलं आणि मी माझ्या मतदारसंघात काय केलं ते आधी पाहा, असे आव्हान महाजन यांनी खडसेंना दिले.

“मी राष्ट्रवादीतच, नड्डांनी गळ्यात मफलर टाकला होता पण..”, भाजपप्रवेशाला नाथाभाऊंचा फुलस्टॉप!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube