ठाकरे गटात पडणार फूट? निम्मे आमदार आमच्या संपर्कात.. गुलाबराव पाटलांच्या दाव्याने खळबळ!
Gulabrao Patil : राज्याच्या विधानसभेचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. महायुतीने मुसंडी मारत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केलं. या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. काँग्रेसला फक्त 15 जागा जिंकता आल्या. तर ठाकरे गटालाही फक्त 20 जागा मिळाल्या. एकूण महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागा मिळाल्या. या निकालानंतर महाविकास आघाडीच अस्वस्थता वाढली आहे. यातच महायुतीतील शिंदे गटाच्या नेत्यानं केलेल्या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. आता तरी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाही तर जे उरलेले 20 आमदार आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत, असा दावा शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
ठाकरेंचे पाच आमदार आमच्या संपर्कात.. शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ!
एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मतदारसंघात परतल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर घणाघाती टीका केली. पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे. आंदोलन करून आज आम्ही त्यांना मोठं केलंय. ज्यांनी शिवसेनेला मोठं केलं ते लोक आज कुठे आहेत असा सवाल पाटील यांनी विचारला.
आम्ही आंदोलने केले तेव्हा शिवसेना मोठी झाली त्यांच्या महालात आमचीही विट आहे, हे त्या विटांना विसरले. संजय राऊत सारखा दगड त्यांनी आणला. या दगडाने सगळा सत्यानाश करून टाकला आहे. आता तरी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाहीतर त्यांच्याकडे असलेल्या 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे यायला तयार आहेत असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.
एकनाथ शिंदे नाराज नाहीत
एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा असल्या तरी एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत आणि नाराज राहूही शकत नाहीत. मुख्यमंत्रिपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे ठरवतील ते त्यांना मान्य असणार असल्याचं त्यांनी अगोदरच जाहीर केले आहे. येत्या पाच तारखेला शपथविधी होईल अशी अपेक्षा आहे. आपल्या मंत्रिपदाच्या आणि उपमुख्यमंत्रि पदाच्या चर्चा होत असल्या तरी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी आपली इच्छा आहे. आपल्या मंत्रिपदाबाबत आपला नेता निर्णय घेईल असेही गुलाबराव पाटी यांनी स्पष्ट केले.
आता पैलवान उतरलाय, त्यामुळे कुस्ती खेळायचीच ; गुलाबराव पाटलांनी थोपटले दंड, जरांगे पाटलांवर म्हणाले