“शिर्डी आम्हीच लढणार!” ‘मनसे’चा दावा डावलत श्रीकांत शिंदेंनी ठरवूनच टाकलं

“शिर्डी आम्हीच लढणार!” ‘मनसे’चा दावा डावलत श्रीकांत शिंदेंनी ठरवूनच टाकलं

Shrikant Shinde : कोण कुठल्या जागेवरून लढणार यासाठी आणखी दोन दिवसांची वाट पहावी लागेल. लवकरात लवकर जागावाटप जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. शिर्डीत आमचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहेत. या निवडणुकीतही शिर्डीची जागा (Shirdi Lok Sabha) शिवसेनाच लढणार आहे, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी (Shrikant Shinde) शिर्डीची जागा शिवसेनेचीच असल्याचे ठणकावून सांगितले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या पेच वाढला आहे.

नगर दक्षिणेतील महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. पण, शिर्डीचा उमेदवार जाहीर करता आलेला नाही. येथे इच्छुकांची संख्या वाढली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यानंतर मनसेनेही या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. मनसेने महायुतीकडे नाशिक, दक्षिण मुंबईसह शिर्डीचीही मागणी केली आहे. मात्र, हा तिढा दिसत असतानाही आज खा. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत शिवसेनाच शिर्डी लढणार असल्याचे सांगितले.

नाशिकमध्ये हेमंत गोडसे सेफ : CM शिंदेंचा निरोप न आल्याने शांतिगिरी महाराजांनी निवडली वेगळी वाट

शिवसेना शिंदे गटाच्या संवाद मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आज नगर शहरात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिर्डी मतदारसंघाबाबत मोठा दावा केला. महायुतीचे जागावाटप दोन दिवसांत पार पडेल तसेच उमेदवार देखील जाहीर होतील. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या कामांना सुरुवात देखील करण्यात आली आहे.

शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा इच्छुक आहेत. मात्र नवे राजकीय समीकरणांनुसार मनसे महायुतीत येण्याची शक्यता आहे. मनसेने या जागेवर दावा केला आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, कोण कुठल्या जागेवरून लढणार यासाठी तुम्हाला दोन दिवसांची वाट पहावी लागणार आहे. कारण येत्या दोन दिवसांत महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय जाहीर होईल. शिर्डीमध्ये आजच्या स्थितीला शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. येणाऱ्या काळातही शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनाच लढणार आहे, असा विश्वास देखील यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.

कल्याण : श्रीकांत शिंदे पडणार? ‘वाघिणीला’ मैदानात उतरवत ठाकरे मोठा डाव खेळण्याच्या तयारीत!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube