लवकरच पिक्चर क्लिअर होणार; भाजप नेत्यानं राऊतांना सांगितली ‘मन की बात’
Jalgaon Lok Sabha BJP MP Unmesh Patil meet Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने धक्कातंत्राचा वापर करत अनेक विद्यमान (Jalgaon Lok Sabha) खासदारांना डच्चू दिला आहे. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजपने जळगावात अशाच धक्कातंत्राचा वापर करत खासदार उन्मेश पाटील यांना (Unmesh Patil) तिकीट नाकारले. त्यांच्या ऐवजी या मतदारसंघात स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे खासदार पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी भाजपला धक्का देण्याचा प्लॅन ठरवला. उन्मेष पाटील उद्याच ठाकरे गटात प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. उन्मेष पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे. याआधी उन्मेश पाटील यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.
जळगाव मतदारसंघात भाजप खासदार उन्मेश पाटील इच्छुक होते. परंतु, भाजपने त्यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पाटील यांनी भाजपला धक्का देण्याचे ठरवले आहे. त्यानंतर पाटील यांनी भाजपलाही निवडणुकीत धक्का देण्याचे ठरवले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. येथे आल्यानंतर त्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.
यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना उन्मेश पाटील यांच्यासंदर्भात विचारले असता, संजय राऊत म्हणाले, अनेक वर्ष ते (उन्मेश पाटील) भाजपाचे काम करत आहेत. अनेक चळवळीशी ते जोडलेले आहेत. त्यांची प्रतिमा उत्तम आहे, तरी देखील भाजपने त्यांची उमेदवारी कापली. त्याबद्दल आम्हाला आश्चर्य आहे. ते अस्वस्थ आहेत हे नक्की. ते आम्हाला भेटले चर्चा झाली.
आता ते पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले आहेत. उद्यापर्यंत सर्व कळेल अशा सूचक शब्दांत संजय राऊत यांनी खासदार उन्मेश पाटील यांची मन की बात सांगितली. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. उद्यापर्यंत सर्व समजेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
‘संजय राऊत कितना झूठ बोलोगे? ‘त्या’ बैठकीचा उल्लेख करत आंबेडकरांचा हल्लाबोल