‘नाशिक’वरून महायुतीत ‘महाभारत’! “शिस्त पाळा” म्हणत भुजबळांचे श्रीकांत शिंदेंना खडेबोल
Chhagan Bhujbal on Shrikant Shinde : नाशिक लोकसभेच्या जागेवरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस चांगलीच वाढली आहे. या वादाची सुरुवात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी करून दिली. जागावाटपाचा निर्णय अंतिम होण्याआधीच त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यांची ही घोषणा भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांच्याकडून शिंदे यांना टार्गेट केले जात असतानाच या वादात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उडी घेतली आहे. भुजबळ यांनी श्रीकांत शिंदे यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. महायुतीत असताना सगळ्यांनी थोडी तरी शिस्त पाळावी, अशा शब्दांत भुजबळ यांनी बाजू मांडली.
Chhagan Bhujbal : ‘लहान पक्षही मोठे होतात’; छगन भुजबळांचा बावनकुळेंना खोचक टोला
खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या जागेवर खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. परंतु, जागावाटपात ही जागा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर भुजबळ म्हणाले, नाशिकच्या जागेबाबत शिंदे गटाने जी भूमिका घेतली आहे त्यास भाजपकडून विरोध होणे स्वाभाविक आहे. श्रीकांत शिंदे यांना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकारच नाही. ते असे कसे जाहीर करू शकतात. महायुतीत असताना थोडी शिस्त सगळ्यांनीच पाळली पाहिजे.
जयंत पाटील म्हणतात एक फोन केला तर माझ्यासाठी सुद्धा पहाटेचा शपथविधी होऊ शकतो, या वक्तव्यावर भुजबळांनी त्यांची खिल्ली उडवली. सध्या जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात आहेत. आम्ही कित्येक महिन्यांपासून हेच ऐकत आहोत. आधी त्यांचं फायनल होऊ द्या मग पाहू. शपथविधी पहाटेचा करा. रात्रीचा करा. याचा अर्थ तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात याला तुम्हीच दुजोरा देत आहात, असे भुजबळ जयंत पाटलांना उद्देशून म्हणाले.
१० लोकसभा जागांवर अजित पवार गटाचा दावा कायम; जागावाटपावरून भुजबळ आक्रमक
चिन्ह आमच्याकडे आम्ही वापरणारच
आम्ही शरद पवार यांचे फोटो कुठेही वापरलेले नाहीत. चिन्ह सध्या आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही ते वापरणारच आहोत. मी स्वतः शरद पवार यांचे फोटो कुठेही वापरलेले नाहीत. शरद पवार यांचे फोटो दाखवा आणि मत मिळवा मी असे कुठेही म्हणालो नाही. प्रचार करण्यासाठी अजून वेळेचं आलेली नाही. अद्याप निवडणुकांची घोषणा झालेली नाही, असे भुजबळ म्हणाले.