सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; हवामान विभागाने दिला इशारा
Maharashtra Rain Update : राज्यात काल मान्सूनच्या परतीच्या (Maharashtra Rain) पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मुंबईत तर काल रात्री धो धो पाऊस (Heavy Rain) कोसळला. पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणतील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी होती. आजही पावसाचा मुक्काम कायम राहणार असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाचा आजचा अंदाज काय
भारतीय हवामान विभागाने आज (IMD Rain Alert) मुंबई महानगराला आज सकाळपर्यंत अतिमुसळधार पावसाचा रेड (Heavy Rain) अलर्ट जारी केला आहे. आज या भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन महापालिका (Mumbai Rains) प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच ठाणे, मुंबई, नंदूरबार, नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उत्तर भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासाठी ऑरेंज तर नाशिक पालघरला रेड अलर्ट; पावसाची स्थिती काय?
‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा
बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, जळगाव, नगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.