अजितदादांच्या दिल्लीवारीवर भुजबळांचं नो कमेंट्स; भुजबळांच्या मनात नेमकं काय?

अजितदादांच्या दिल्लीवारीवर भुजबळांचं नो कमेंट्स; भुजबळांच्या मनात नेमकं काय?

Chhagan Bhujbal on Ajit Pawar : नाशिक जिल्ह्यातील सुरगणा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्याला नरहरी झिरवाळ उपस्थित आहेत. मात्र त्यांच्याच पक्षातील दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) दांडी मारली आहे. त्यांच्या या गैरहजेरीचीच जास्त चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मी आणि भुजबळ एका कुटुंबाप्रमाणे काम करतो अशी प्रतिक्रिया आज अजितदादांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. मात्र, यानंतर प्रसारमाध्यमांनी छगन भुजबळांंना अजित पवारांच्या वेषांतराच्या मुद्द्यावर विचारलं तर छगन भुजबळांनी यावर उत्तर देणंच टाळलं.  या प्रकाराची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राजकारणात इकडून तिकडे तिकडून इकडे चालणारच, शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य’

खरंतर आज सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळांचं कौतुक करत अजित पवारांना खोचक टोला लगावला होता. छगन भुजबळ यांनी केलेलं वेषांतर हे महाराष्ट्रासाठी होतं पण अजित पवारांनी केलेलं वेषांतर राजकारणासाठी होतं असं संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर पत्रकारांनी छगन भुजबळांना प्रश्न विचारला. पण, भुजबळांनी आपल्या नेहमीच्या उत्तर टाळण्याच्या शैलीत चला पुढे असे म्हणत काहीही बोलण्यास नकार दिला.

आता भुजबळांनी असं का केलं याची चर्चा सुरू झाली आहे. वाटलं तर त्यांंना अजित पवारांचा बचाव करता आला असता. याआधी पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीने भुजबळ आणि आमच्यात कोणतीच नाराजी नाही. आम्ही एका कुटुंबाप्रमाणे काम करतो असे उत्तर देत टायमिंग साधलं होतं. परंतु, भुजबळांचा पत्रकार परिषदेतला पवित्रा मात्र वेगळाच होता. त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. त्यामुळे छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत का, शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांच्याही मनात चलबिचल सुरू झाली आहे का, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

जरांगेंकडून महादेव जाणकरांचा उल्लेख मात्र पुन्हा भुजबळांना टोला, म्हणाले, आमचा विरोधक

अजितदादा वेश बदलून दिल्लीत ?

अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याआधी अनेकदा दिल्लीला गेले होते. येथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठका घेतल्या होत्या. या बैठकीसाठी अजित पवार मास्क आणि टोपी घालून हजर राहत होते असा खुलासा अजितदादांनीच काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube