ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर देणार; दिल्लीत पोहचताच इंग्रजीवरून लंकेंचं विखेंना चॅलेंज

ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर देणार; दिल्लीत पोहचताच इंग्रजीवरून लंकेंचं विखेंना चॅलेंज

Nilesh Lanke Gives Challenge to Sujay Vikhe When reach at Delhi : लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज लढतील पैकी एक लढत म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लंके ( Nilesh Lanke ) विरुद्ध विखे ( Sujay Vikhe ) . त्यात विखे आणि लंके यांच्यामध्ये प्रचारा दरम्यान एकमेकांवर विविध आरोप आणि टीका करण्यात आली. त्यात विखेंनी लंकेंना इंग्लिश येत नसल्यावर टोला लगावला होता. त्यावर आता लंके यांनी खासदार म्हणून पहिल्यांदाच दिल्लीत गेल्यानंतर ‘ज्याला जी भाषा समजते त्याला त्या भाषेत उत्तर देणार’ असं म्हणत विखेंनाआव्हान दिलं आहे.

भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी; ‘या’ तीन खेळाडूंवर पाकिस्तान बोर्ड करणार कारवाई?

यावेळी बोलताना लंके म्हणाले की, इंग्रजीचे धडे लावण्याची गरज नाही. तसेच कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही. पण माणूस पाण्यात पडला की, पोहायला शिकतो. तशीच ही परिस्थिती आहे. मी एकदा अंदाज घेतो. अद्याप मला संसद कुठे आहे? हे देखील माहित नाही. त्यामुळे आत गेल्यानंतर मी शिकेल की समोरच्या व्यक्तीला कोणती भाषा अभिप्रेत आहे त्याच भाषेत मी बोलेल. समोरच्याला माझी भाषा कळत नसेल तर त्याला जी भाषा समजते. त्या भाषेतच मला माझा प्रश्न मांडावा लागेल. जशास तसं उत्तर द्यावं लागेल. असं म्हणत यावेळी लंके यांनी सुजय विखेंना इंग्रजी भाषेवरून टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते सुजय विखे?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. प्रचारादरम्यान एका मेळाव्यात सुजय विखे यांनी निलेश लंके यांना थेट आव्हानच देऊन टाकले होते. मी जेवढी इंग्रजी बोलल तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. असे आव्हान सुजय विखे यांनी दिले होते.

“लोकसभेला साथ दिली, पुढे तीन महिन्यांनीही द्या”, शरद पवारांची विधानसभेसाठी फिल्डिंग

नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच विखे यांनी संसदेतील त्यांच्या इंग्रजी भाषणाचा एक व्हिडिओ दाखवला होता. याचाच आधार घेत सुजय विखे यांनी निलेश लंकेंना आव्हान दिले होते. महिनाभरात त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असे आव्हान दिले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज