“होय, मला सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर होती”, ठाकरेंच्या खासदाराचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण (Maharashtra Politics) पराभव झाला. या पराभवानंत मविआतील राजकीय पक्ष सैरभैर झाले आहेत. या पक्षातील नेत्यांना आपल्या भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. यातच पक्षांतराचं राजकारण सुरू झालं आहे. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसला आहे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी (Rajabhau Waje ) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी खासदार झालो तेव्हा मलाही पक्ष सोडून आमच्या पक्षात सहभागी व्हा असा निरोप होता, असे खासदार वाजे म्हणाले आहेत.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काल नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात आम्ही इथेच या विषयावर खासदार संजय राऊत यांनी खासदार वाजे यांची मुलाखत घेतली. राजाभाऊ उद्धव सेनेचे खासदार फुटीच्या वावड्या उठत असतात त्यात तुमचेही नाव असते पण तु्म्ही आहे तिथेच राहीलात असे का? हा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. त्यावर वाजे यांनी उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख म्हणून सक्षम असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीच्या 39 पैकी 30 आमदारांचा ‘शून्य’ उपयोग : अजितदादांना सोबत घेऊन भाजपवर पश्चातापाची वेळ
माझं कुटुंब अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. मी साधारण दहा ते बारा वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावलं पण यश मिळालं नाही. पण पक्ष सोडला नाही. नंतरच्या काळात पक्षात फूट पडली. मी खासदार झालो. तेव्हा मलाही पक्ष सोडून आमच्या पक्षात सहभागी व्हा असा निरोप होता. पण असं कदापि होणार नाही असे राजाभाऊ वाजे यांनी निक्षून सांगितले.
शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा : ठाकरे
अमित शाहजी जर तुम्हाला खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा. फक्त मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या नावाचा वापर करु नका अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केली.
Amit Shah: सहकारी साखर कारखान्यांनी उसाशी नव्हे तर नफ्याशी लग्न केलंय -अमित शहा