Girish Mahajan on Eknath Khadse : भाजपने आपली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती जिरवावी लागेल, अशी जहरी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंची मस्ती अजून जिरली नाही का? असा हल्लाबोल केला आहे. गिरीष महाजन […]
अहमदनगर: कर्जतमधील एमआयडीसीवर आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले होते. या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जोरदार संघर्ष पाहिला मिळाला. या एमआयडीसीवरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. या दोघांमध्ये वाद सुरू असताना एमआयडीसी मंजूर करण्याबाबत खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आता तब्बल दोन एमआयडीसी मंजूर करून बाजी मारली आहे. […]
जळगाव : अमळनेरचे तीनवेळचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (5 सप्टेंबर) जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेपूर्वी पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. बी. एस. पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक […]
Udhav Thackeray : यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. सप्टेंबर महिना सुरु झाला मात्र तरी देखील अपेक्षित असा पाऊस झाला नाही आहे. अशीच काहीशी परिस्थिती नगर जिल्ह्यात देखील झाली आहे. दरम्यान, याच परिस्थिची माहिती घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 8 सप्टेंबरला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. आगामी काळात विधानसभा […]
Rohini Khadase : मणिपूरच्या घटनेवरील संसदेतील चर्चेवरून रोहिणी खडसे (Rohini Khadase) यांनी भाजपवर टीका केली. त्या म्हणाल्या की, मणिपुरमध्ये ज्याठिकाणी नग्न अवस्थेत महिलेची धिंड काढली गेली. संसदेत त्यावर बोलण्याऐवजी भाजप सरकारकडून राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किसची चर्चा करण्यात आली. तसेच त्यांच्या सरकरमधील कोणत्याही महिलेने त्यावर आवाज उठवला नाही. असं म्हणत त्यांनी जोरदार प्रहार केली. त्या […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे ग्रामस्थ उपोषणास बसले आहे. तसेच या ग्रामस्थांनी जालन्यात उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला आहे. Maratha Reservation : फडणवीसांच्या माफीने आंदोलकांवरील लाठीचार्चमागील कर्ता करविता समोर; […]