अहमदनगरः भाजपचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) व त्यांचा मुलगा अक्षय हे एका प्रकरणात चांगलेत गोत्यात आले आहेत. बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी माता मंदिराचे प्रमुख व पुजारी अॅड. अभिषेक विजय भगत (Abhishek bhagat) यांना धमकाविल्याप्रकरणी कर्डिलेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी माता मंदिराचे पुजारी अॅड. […]
Shiv Shakti Yatra : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रेची चर्चा सध्या राज्यात होत आहे. नुकतेच ही यात्रा जामखेडमध्ये आली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेले स्वागत स्वीकारत आभार मानले. यावेळी त्यांनी आपण काही दिवस सुट्टीवर का गेलो याचे कारण देखील सांगितले. यावेळी बोलताना भाजप […]
Balasaheb Thorat On Pm Modi : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेत माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, जो भाजपच्या विरोधात जाईल त्याला लगेच ईडी लावायची. त्याचवेळी इस्त्रोचं यान विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरत होतं, त्यावेळी पंतप्रधान मोदींना स्क्रीनवर दाखवले जात होते, त्यावरुन आमदार थोरात […]
Ahmednagar : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी तसेच शहरातील स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने थेट नगरकरांशी संवाद साधण्यासाठी रविवारी जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कॉंग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आगामी निवडणुका पाहता, या यात्रेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या […]
Dada Bhuse on Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर दौऱ्यात राज्य सरकावर जोरदार टीका केली होती. एक रुपयांत पीक विमा देण्याची योजना फसवी असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे की एक रुपयांत पीक विमा ही योजना देणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे. […]
जळगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते जळगावात रविवारी (दि. 10) होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शासनाने स्थगिती दिली. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. पुतळ्यांच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून सध्या जळगावात चांगलंच राजकारण तापलं असून ठाकरे गटाविरुद्ध भाजप आणि […]