राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली असून उत्तर महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी महायुतीलाच आशिर्वाद दिला असल्याचं दिसून येत आहे.
येवला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी दणदणीत विजय मिळवून महाविकास आघाडीचे माणिक शिंदे यांचा पराभव केलायं.
विरोधकांना मोठ्या मताधिक्क्याने धूळ चारत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले आणि संग्राम जगताप या जावई सासऱ्यांनी विधानसभेवर धडक मारलीयं.
संगमनेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ आघाडीवर असून महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला असल्याचं समोर आलंय.
राहुरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले 805 मतांनी आघाडीवर आहेत, तर महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे पिछाडीवर आहेत.