शरद पवारांनी आव्हाडांची पक्षातून हाकलपट्टी करावी; मंत्री विखे आक्रमक

शरद पवारांनी आव्हाडांची पक्षातून हाकलपट्टी करावी; मंत्री विखे आक्रमक

Radhakrishan Vikhe Criticize Jitendra Awhad : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishan Vikhe ) यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राजकारणासाठी डॉ.आंबेडकराच्या नावाचा वापर करणाऱ्या स्टंटबाज पुढाऱ्यांची शरद पवार ( Sharad Pawar) यांनी पक्षातून हाकलपट्टी करावी. आशी मागणी मंत्री विखे यांनी केली.

Bigg Boss OTT 3: प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी सुरू होणार ‘बिग बॉस ओटीटी 3’ जाणून घ्या…

मंत्री विखे पाटील म्हणाले की, भावनेच्या भरात आपण काय करतो. याचे भान राहीले नसलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य अतिशय निंदनीय असून, डॉ. आंबेडकरी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना या घटनेन दुखावल्या गेल्या आहेत.जितेंद्र आव्हाड यांच्या सारख्या काही स्टंटबाज नेत्यांनीच राज्याचे सामाजिक राजकीय वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू केले आहेत.

वर्सोवा पुलाजवळ भूस्खलन; पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली अडकला, बचावकार्य सुरू

राजकारणात आता जनतेचे पाठबळ मिळत नसल्याने आशी कृत्य करून प्रसिध्दी मिळविण्याचा हव्यास करताना आ.आव्हाड यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुध्दा पुरली नाही हे अतिशय खेदजनक असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. जेष्ठ नेते शरद पवार यांनी या कृत्याचा निषेध म्हणून आव्हाड यांची तातडीने पक्षातून हाकलपटी केली पाहीजे. आशी मागणी करून, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आता कोणामुळे धोका आहे. हे चेहरे सुध्दा आज या घटनेमुळे राज्याला समजले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

काय आहे नेमकं प्रकरण?

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव ‘एससीईआरटी’ने मांडल्यानंतर राष्ट्रवादीची (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रस्तावाविरोधात त्यांनी 28 मे ला महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. त्यांच्यावर अखेर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज